आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Of The United Kingdom Boris Johnson Will Be The Chief Guest On Republic Day 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनने आमंत्रण स्वीकारले:प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन असणार प्रमुख पाहुणे, G-7 शिखर परिषदेसाठी मोदींनाही केले आमंत्रित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासाठी त्यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी मंगळवारी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चासत्रात ही माहिती दिली.

डॉमिनिक रॉब यांनी म्हटले की, "पंतप्रधान जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवल्याबद्दल मला आनंद झाला आहे. पीएम जॉनसन यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. आमच्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे. त्याचबरोबर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या वर्षी ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी -7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे."

भारत G-7 ग्रुपचा सदस्य नाही

जगातील सात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या G-7 ग्रुपमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारत या ग्रुपचा सदस्य नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser