आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister's VVIP Aircraft Air India One : The Ability To Refuel The Aircraft In The Air, Possible To Cover A Distance Of 12 Thousand Km At A Time; The Boeing 777 Is Valued At Rs 8,458 Crore

पंतप्रधानांचे व्हीव्हीआयपी विमान:विमानात हवेत इंधन भरण्याची क्षमता, एकाच वेळी 12 हजार किमीचे अंतर पार करणे शक्य; बोइंग-777 विमानाची किंमत 8458 कोटी रुपये

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींचे खास विमान घेण्यासाठी पथक रवाना, पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीही करतील वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे एक विशेष विमान मिळणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, भारताने अमेरिकेकडून बोइंग-७७७ ही दोन विमाने खरेदी केली आहेत. दोन्ही विमानांची किंमत ८४५८ कोटी रुपये आहे. यापैकी एक विमान याच आठवड्यात भारताला मिळेल. हे आणण्यासाठी नॅशनल कॅरिअर एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अमेरिकेत रवाना झाले आहे. या विमानाची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीदेखील या व्हीव्हीआयपी विमानाचा वापर करतील. आगामी काळात एअर इंडियाएेवजी बजाज एअरफोर्स हे विमान ऑपरेट करेल. या विमानाचे कॉल साइन एअरफोर्स वन हे असू शकते. राफेलप्रमाणे या विमानात हवेतच इंधन भरण्याची क्षमता असेल. विशेष बाब म्हणजे, इंधन भरल्यानंतर हे विमान सलग १७ तास उड्डाण करू शकते.

सुरक्षित सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टिमही

हे विमान अत्यंत सुरक्षित आहे. याच्या पुढील भागात जॅमर बसवले आहे.ते शत्रूच्या रडार सिग्नलला निष्क्रिय करते. यावर मिसाइलच्या हल्ल्याचाही परिणाम होत नाही. विमानात ऑफिस आणि एक मीटिंग रूमही असेल. तसेच यात मिरर बॉल प्रणालीचाही वापर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर यात अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रणालीदेखील आहे.

> हे विशेष विमान इन्फ्रारेड सिग्नलने चालणाऱ्या मिसाइलला निष्क्रिय करेल.

> बोइंग-७७७ विमानाची ८४५८ कोटी रुपये एवढी किंमत आहे.

बातम्या आणखी आहेत...