आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठा भाऊ प्रिन्स विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा खुलासा ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 2019 मध्ये दोघांमध्ये वाद झाला तेव्हा विल्यम यांनी आपली कॉलर पकडली आणि जमिनीवर आपटले. यावेळी हॅरी कुत्र्याच्या अन्नाच्या एका वाडग्यावर पडला. त्यामुळे वाडगे तुटले आणि हॅरीच्या पाठीला दुखापत झाली, असे हॅरी यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले. त्यांचे 'स्पेअर' हे आत्मचरित्र 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. यापूर्वी इंग्लंडच्या 'गार्डियन' वृत्तपत्राने पुस्तकातील काही उतारे शेअर केले आहेत.
मेगनला म्हटले असभ्य
गार्डियनच्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये राजघराण्यातील दोन भावांमध्ये वाद झाला होता. यावेळी विल्यम यांनी हॅरी यांची पत्नी मेघनला असभ्य म्हटले. दोघे भांडत स्वयंपाकघरात गेले आणि विल्यमर यांनी रागाच्या भरात हॅरी यांना जमिनीवर आपटले.
हॅरी यांनी लिहिले की, या घटनेने ते थक्क झाले. त्यांनी विल्यम यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यानंतर विल्यम निघून गेले आणि काही वेळाने परतले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खंत दिसत होती. जेव्हा विल्यम पुन्हा निघू लागले. तेव्हा त्यांनी मागे वळून हॅरी यांना या घटनेचा उल्लेख पत्नी मेगनकडे करु नये, असे सांगितले. तेव्हा तुझी अशी इच्छा आहे की तु माझ्यावर हल्ला केला हे मी मेगनला सांगू नये. त्यावर विल्या म्हणाले की, मी तुझ्यावरहल्ला केला नाहीच.
दुसरा मुलगा स्पेयर
प्रिन्स हॅरी यांच्या 'स्पेअर' पुस्तकाचे नाव राजघराण्यातील जुन्या म्हणीवरुन घेतले आहे. म्हणीनुसार पहिला मुलगा हा सत्तेचा वारस असतो. तर दुसरा मुलगा फक्त स्पेयर असतो. ज्याची गरज तेव्हाच लागते. जेव्हा मोठ्या मुलासोबत काही घडते. हॅरी पुस्तकात सांगतात की, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील किंग चार्ल्स यांने आई डायनाला म्हटले होते की, शाब्बास, तू मला वारस आणि स्पेयर असे दोन्ही दिले आहेत. आता माझे काम संपले.
पुस्तक प्रकाशनानंतर आणखी खुलासे अपेक्षित
10 जानेवारी रोजी पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन झाल्यानंतर आणखी अनेक खुलासे अपेक्षित आहेत. त्याआधी, हॅरी यांच्या दोन मुलाखती देखील प्रसारित केल्या जातील. ज्या त्यांनी यूकेच्या आयटीव्ही न्यूज आणि यूएसच्या सीबीएसला दिल्या आहेत. आयटीव्ही न्यूजने मुलाखतीचा ट्रेलर रिलीज केला. ज्यामध्ये वडील आणि भाऊ परत हवे आहेत, असे हॅरी म्हणताना दिसून येत आहेत.
प्रिन्स हॅरी मुलाखतीत म्हणाले - राजेशाही सोडली तेव्हा माझ्याविरुद्ध अफवा उठवण्यात आल्या
राजघराण्याच्या 'वरिष्ठ रॉयल'पदाचा त्याग केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स हॅरी यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली आहे. आपल्याला भाऊ आणि वडील परत हवे आहेत, असे ते म्हणाले. तसेच राजेशाहीतील जबाबदारी सोडली तेव्हा माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या, असेही ते म्हणाले. फॉक्स न्यूजने 8 जानेवारीला पूर्ण मुलाखत प्रसारित होण्यापूर्वी मुलाखतीच्या काही क्लिप प्रसिद्ध केल्या. ज्यामध्ये हॅरी अनेक दावे करताना दिसत आहे. त्यांनी ही मुलाखत ITV चे टॉम ब्रॅडली आणि अँडरसन कूपर यांना दिली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.