आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय उच्च माध्यमिकच्या शाळेच्या प्राचार्य डॉ. शीला आसोपा यांनी ५०० शाळांतील सुमारे २५० अंगणवाडी केंद्राद्वारे ३० हजार विद्यार्थ्यांना हँडवॉशविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला. तीस सेकंद हँडवॉश वापरण्याचे लाभ त्यांनी मुलांना सांगितले. धवा येथे नोकरीला असताना आसोपा यांनी दोन हजार मुलांचे एकाच वेळी हँडवॉश करण्याचा विक्रम नोंदवला होता. लंडनची वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांचा गौरव केला होता. कोरोनाकाळात त्यांची कामगिरी व प्रासंगिकता लक्षात घ्यावी लागेल. अलीकडेच डॉ. शीला यांना त्यांच्या कामगिरीबद्दल केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
शालेय अभ्यासक्रमात हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व, जागृती, दूषित हातांचे दुष्परिणाम, योग्य प्रकारे हात धुण्याची प्रक्रिया इत्यादी गोष्टींचा समावेश केला जावा, असा सल्ला डॉ. शीला यांनी दिला आहे. शीला यांनी शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे आपला सल्ला पाठवला. त्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणात नियमित प्रशिक्षण कार्यक्रमात या मुद्द्याचाही समावेश केला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. आसोपा जोधपूर जिल्ह्यातील शाळांत सोबत स्वत:चे प्रोजेक्टर घेऊन जातात. पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्या मुलांना हात कसे स्वच्छ धुतले पाहिजेत याची माहिती देतात. त्यात अंगठा, करंगळी वगैरे स्वच्छ धुण्याच्या पद्धतींबद्दल तपशिलात माहिती दिली जाते. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत २५ हजारांवर पॉम्प्लेट वाटप करून जनजागृतीचे काम केले आहे. एका वेळी साबणाने हात धुण्यासाठी ३० ते ४५ सेकंदांचा कालावधी लागतो.
हात न धुता भोजन करणाऱ्या मुलांमुळे सुचली कल्पना
डॉ. शीला म्हणाल्या, एकदा शाळेत विद्यार्थी मध्यान्ह भोजनावेळी हात न धुता जेवत होते. हात स्वच्छ केले नाही तर मुलांमध्ये अनेक आजार होऊ शकतात हे त्यांनी वाचले होते. त्यावरून त्यांनी जागृती आणण्याचा संकल्प केला. बावडी स्कूलमध्ये अनेक हँडवॉश पॉइंट तयार करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.