आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Priority Should Be Given To Work From Home, Sanitizer In Office; Necessary To Cover Face In Public Places And Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 4.0:दुकानात एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक जाऊ शकणार नाहीत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे लागेल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • लग्न सोहळ्यात 50 आणि अंत्यविधीत 20 पेक्षा जास्त लोक सामील होऊ शकणार नाहीत

सरकारने रविवारी लॉकडाउनच्या चौथ्या फेजच्या गाइडलाइन्स जारी केल्या. हा लॉकडाउन 4.0 18 मे-31 मे पर्यंत असेल. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार लग्न सोहळ्यात 50 आणि अंत्यविधीत 20 पेक्षा जास्त लोक सामील होऊ शकणार नाहीत. तसेच, ऑफीसमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल आणि सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑफीसमध्ये थुंकल्यास दंड आकारला जाईल.

सरकारने जारी केलेले दिशा-निर्देश
सरकारने जारी केलेले दिशा-निर्देश

नवीन नियमांनुसार, सरकारने सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, तंबाखू-गुटखा खाण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच एखाद्या दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहक एकावेळी जाऊ शकणार नाहीत. या ग्राहकांनाही शारिरीक अंतराचे पालन करावे लागेल. तसेच, शक्यत तेवढे वर्क फ्रॉम होमला प्राध्यान्य देण्यावर भर द्यावा.

कोविड-19 बाबत केंद्राचे दिशा- निर्देश

 • सार्वजनिक ठिकाणे आणि ऑफीसमध्ये मास्क घालणे आवश्यक.
 • सार्वजनिक ठिकाणी आणि ऑफीसमध्ये थुंकणे गुन्हा, दंड आकारला जाईल.
 • सर्व ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावेच लागेल.
 • सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा आणि तंबाकू खाण्यावर बंदी.
 • दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहकास येण्यावर बंदी.
 • सार्वजनिक ठिकाणावरील सर्व एंट्री आणि एग्जिट पॉइंटवर थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सँनिटायजर ठेवणे बंधनकारक.
बातम्या आणखी आहेत...