आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली दंगलप्रकरणी तिहार तुरुंगात कैद:कैदेतील उमर खालिदने मागितली मैत्रिणीशी बोलण्यासाठी परवानगी

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएपीए व दिल्ली दंगल प्रकरणात तिहार तुरुंगात कैद उमर खालिदला मैत्रिणीशी फोनवरून बोलण्याची इच्छा आहे. त्यासाठी खालिदने तिहार तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार उमरला उर्वरित कैद्यांप्रमाणेच त्याच्याकडून देण्यात आलेल्या पोस्टपेड क्रमांकावर दररोज घरी बोलण्याची परवानगी आहे. परंतु उमर खालिद इतर क्रमांकावर एका मैत्रिणीशी बोलू इच्छितो. त्यासाठी त्याने तुरुंग अधीक्षकांकडे अर्ज केला आहे. परंतु याबाबतचा अर्ज तिहार तुरुंग मुख्यालयाकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात येणार आहे.वास्तविक कोविडदरम्यान कैद्यांना ही सवलत देण्यात आली होती. कैदी प्रीपेड क्रमांकाहून देखील आठवड्यातून एकवेळा संभाषण करू शकत असे. त्या काळात तो संभाषण करत होता. फोनवरून तो नात्यातील व्यक्तींशी बोलत होता. त्याचबरोबर प्रीपेडवरूनही तो आठवड्यातून एकदा बोलायचा, असे चौकशीत स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...