आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा निर्णय:खासगी बँकाही करू शकतील सरकारी कामकाज; अर्थमंत्र्यांची घोषणा, मंत्रालयाने हटवले निर्बंध

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १०० पीएसयूंमध्ये निर्गुंतवणूक : मोदी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी खासगी बँकांसाठी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने खासगी बँकांवरील सरकारी बँकिंग कामकाज करण्यावर घातलेले निर्बंध हटवले आहेत. म्हणजे आता खासगी बँकाही सरकारी व्यवसायांसाठी अर्ज करू शकतील. त्यामुळे सरकारच्या सामाजिक कल्याणाच्या योजनांची व्याप्ती वाढेल आणि ग्राहकांची सुविधाही वाढेल.आता कर गोळा करणे, महसुलाशी संबंधित देवाणघेवाण, पेन्शनचे व्यवहार आणि किसान बचत पत्रासारख्या लघु बचत योजनांतही खासगी बँकांमार्फत गुंतवणूक करता येऊ शकेल. त्यामुळे खासगी बँकांची विश्वासार्हता आणि व्यवसाय या दोन्हींतही वाढ होईल. ग्राहकांनाही उत्तम सुविधा मिळतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली.

१०० पीएसयूंमध्ये निर्गुंतवणूक : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (पीएसयू) निर्गुंतवणुकीवर भर देताना या कंपन्या सातत्याने तोट्यात असताना त्यांची मदत करणे सरकारचे काम असल्याचे नमूद केले. ‘अर्थसंकल्पात खासगीकरण दृष्टिकोन” या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. अशा १०० पीएसयूंमध्ये निर्गंुतवणुकीतून अडीच लाख कोटी उभे केले जातील,असेही मोदी म्हणाले. पीएसयू जसे चालू आहेत तसे चालवण्याचे यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते. आता हे बदललेच पाहिजे, असेही मोदी म्हणाले.अर्थमंत्र्यांची घोषणा, मंत्रालयाने हटवले निर्बंध

बातम्या आणखी आहेत...