आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi | Congress General Secretary Priyanka Gandhi On Yogi Adityanath Govt, Says Help Poor And Needy People

भाजपवर हल्लाबोल:महाराष्ट्र कोरोना महामारीशी सामना करत आहे आणि भाजप तेथील सरकार पाडण्यात व्यस्त आहे- प्रियंका गांधी

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी गरिबांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकण्याची मागणी केली

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी एक व्हिडिओ जारी केला. यात त्यांनी भाजप सरकारवर निशाना साधला आहे. यावेळी प्रियंका म्हणाल्या की- 'या परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी मतभेद विसरुन पुढे यायला हवे आणि सोबत मिळून महामारीचा सामना करायला हवा. यूपीमध्ये तुम्ही (भाजप)आमच्या एक हजार बसांना नकार दिला. मी तुम्हाला म्हटलं होतं की, बसवर तुम्ही तुमचे बॅनर/पोस्टर लावा. आम्हाला त्याने काहीच नुकसान होणार नव्हते. तुम्ही 12 हजार चालवल्याचा दावा केला, पण त्या फक्त कागदावरच चालल्या. महाराष्ट्रातील सरकारला पाहा. तिथे महामारीने भयंकर रुप घेतले आहे. पण, तुम्ही महाराष्ट्रीत सरकारला पाडण्यात व्यस्त आहात."

यादरम्यान प्रियंका यांनी केंद्र सरकारकडे चार मागण्या केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, 'आज देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत. दहा हजार रुपये प्रत्येक गरजवंताच्या अकाउंटमध्ये टाकावे. दुसरी मागणी ही आहे की, पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक गरजवंताच्या खात्यात साडे सात हजार रुपये टाकले जावेत. जे प्रवासी मजूर आपल्या घरी पोहचले आहेत, त्यांना मनरेगाअंतर्गत 100 ते 200 प्रतिदीन मजुरी वाढवून द्यावी. दोन महिन्यांपासून लहान व्यावसायिकांकडे काहीच काम नाही. त्यांच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज द्यावे. या मागण्या प्रियंका गांधी यांनी यावेळी केल्या.

'देशातील जनता दुःखात आहे, पण तुम्ही मौन आहात' 

प्रियंका पुढे म्हणाल्या की, "मी एक आग्रह करू इच्छिते. विशेष करुन भाजप नेत्यांना. राजकारण बंद करा, ही राजकारण करण्याची वेळ नाही. या परिस्थिती सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन काम करावे. आपली विचारधारा बदलून एकत्र येऊन काम करुयात." 

0