आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi Jakhu Temple Shimla Visit; Bajrang Bali Controversy | Congress | Karnataka Result

बजरंगबलीचे आशीर्वाद:कर्नाटक निकालादरम्यान प्रियांका गांधींनी घेतले दर्शन, शिमल्यातील मंदिरात केली पूजा

शिमला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधीही बजरंगबलीच्या दर्शनाला गेल्या होत्या. कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचारात बजरंगबलीचा मुद्दाही बराच गाजला होता. त्यांनी हिमाचल प्रदेशातील शिमलाच्या जाखू येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. पूजा करून बजरंगबलीचे आशीर्वाद घेतले. जाखू मंदिराचे ट्रस्ट सदस्य दीपक सूद, अश्वनी सूद यांनीही प्रियांका गांधींना बजरंगबलीचे चित्र भेट दिले.

जाखू मंदिरात प्रियांका गांधी ध्यानात मग्न.
जाखू मंदिरात प्रियांका गांधी ध्यानात मग्न.

ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका सुमारे 10 ते 15 मिनिटे मंदिरात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मंत्रोच्चारही केले. त्यांनी मंदिराबाहेर समर्थकांसोबत छायाचित्रेही काढली. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रियांका गांधी सकाळी जाखू मंदिरात पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा ताफा मंदिरात पोहोचताच धावपळ सुरू झाली. त्याच वेळी, त्यांचे समर्थक आणि चाहते त्यांना पाहण्यासाठी खूप उत्साहित दिसले. प्रियांकाने आपल्या टूरचा फोटो-व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला आहे.

प्रियांका गांधींना बजरंगबलीचा फोटो सादर करताना मंदिर अधिकारी.
प्रियांका गांधींना बजरंगबलीचा फोटो सादर करताना मंदिर अधिकारी.

प्रियांका 2 दिवस आईसोबत छाबरामध्ये

​​​​​​​प्रियांका गांधी शिमलातील छाबरा येथील त्यांच्या निवासस्थानी 2 दिवस मुक्काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या आई सोनिया गांधीही आहेत. निवडणुकीचा थकवा दूर करण्यासाठी दोघीही सुटी साजरी करण्यासाठी येथे आल्या आहेत. प्रियांका यांचे घर शिमल्यापासून 15 किमी दूर कुफरी येथील छाराबरा येथे आहे. शिमल्याच्या जाखू मंदिरात हनुमानजींची 108 फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती अमिताभ बच्चन यांच्या कन्येने बनवली आहे, ज्यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक मंदिरात येतात.

प्रियांका गांधी त्यांच्या एका समर्थकासोबत सेल्फी काढताना.
प्रियांका गांधी त्यांच्या एका समर्थकासोबत सेल्फी काढताना.
प्रियांका गांधी त्यांच्या एका वयोवृद्ध समर्थकाला भेटताना.
प्रियांका गांधी त्यांच्या एका वयोवृद्ध समर्थकाला भेटताना.