आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षविराम:असंतुष्टांना एकत्र आणण्यासाठी प्रियंका सज्ज, आता जी-23 सदस्यांना पसंती

नवी दिल्ली / मुकेश काैशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड टास्क फोर्ससह अनेक समित्यांमध्ये नाराजांना देणार महत्त्वाची भूमिका

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस आपल्या घरातील भांडणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या महिन्यात कॉंग्रेस कार्यकारी समिती आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या तीन बैठका झाल्या असून पक्षाने एकसंघ चेहरा यात समाेर आणला आहे. इतकेच नव्हे तर पक्षात सुधारणा घडवून आणण्याची मागणी करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचेही मन वळवण्यात यश आले आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी फेब्रुवारीमध्ये नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन वळवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि दोन महिन्यांतच त्यांनी आपल्या या माेहिमेला यश मिळत असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने काेविड कृतिगट स्थापन केला असून त्यात प्रियंका वाड्रासह गुलाम नबी आझाद यांचे नाव अग्रभागी हाेते. यामध्ये नाराज असलेल्या जी-२३ चे मुकुल वासनिक यांचाही समावेश करण्यात आला आहे. विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर दुसरी समिती गठीत करण्यात आली असून त्यात मनीष तिवारी यांचा समावेश केला आहे. अन्य नाराज नेत्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी जी -२३चे ज्येष्ठ सदस्य विवेक तन्खा यांचे उघडपणे कौतुक केले. कोविड संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तन्खा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बी.व्ही. श्रीनिवास यांनाही कोविड टास्क फोर्समध्ये स्थान देण्यात आले आहे.

साेनिया गांधी २०२२ पर्यंत अध्यक्ष, गुरदीप सिंह सप्पल करत आहेत प्रियंकाला मदत
पक्षातील कलह शांत करण्यात मिळत असलेल्या यशाने प्रियंका गांधींची भूमिका विस्तारत आहे. यापूर्वी त्यांनी स्वत:ला उत्तर प्रदेशपुरते मर्यादित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आसाम आणि केरळपर्यंत प्रचार केला होता. उत्तर प्रदेशात त्यांची पूर्व विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण राज्याची जबाबदारी प्रियंकाच्या खांद्यावर आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील २०२२ पर्यंतच्या विधासभा निवडणुकांपर्यंत साेनिया गांधी याच पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून राहतील यावर पक्षात जवळपास सर्वांचे एकमत झाले आहे. १० मे राेजी हाेणारी कॉंग्रेस कार्यकारिणी निवडणूक तहकूब करण्याचा प्रस्ताव औपचारिकपणे मंजूर झाला. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित नव्हते. राज्यसभा टीव्हीचे माजी प्रमुख गुरदीपसिंग सप्पल प्रियंका गांधी यांना पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याच्या माेहिमेत मदत करत आहेत.

आझाद यांना राज्यसभेवर पाठवण्यावर एकमत
माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसपास राहणाऱ्या चाैकडीच्या कामकाजाबद्दल बहुतांश नेत्यांना आक्षेप असल्याने पक्षाध्यक्षांनी नाराज नेत्यांचे मन वळवण्याची जबाबदारी प्रियंका यांच्यावर साेपवली.जी -२३ च्या जम्मू बैठकीनंतर १० जनपथने बंडखोरीला गांभीर्याने घेतले. केरळ आणि आसाममधील निकालांमुळे राहुल यांना अध्यक्ष बनविण्याचा मुद्दा उचलून धरणाऱ्यांच्या हाती फारसे पडले नाही. गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यास सहमती झाल्याचे कळते. कपिल सिब्बल, शशी थरूर भूपिंदरसिंग हुडा आणि अन्य नाराजांनाही महत्त्वाची भूमिका देण्याची तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...