आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका म्हणाल्या– बेरोजगारांना दरमहा 4000 रुपये देणार:तेलंगाणातील तरुणांना खासगी कंपन्यांत 75 टक्के आरक्षणही देणार

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2023 च्या अखेरीस तेलंगाणामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. याआधी प्रियांका गांधी यांनी सोमवारी हैदराबादच्या सरूरनगर स्टेडियममध्ये युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी जनतेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, तेलंगाणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये बेरोजगारी भत्ता देऊ.

राज्यातील सरकारच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये तेलंगाणातील तरुणांना 75 टक्के आरक्षण असेल. राज्यातील 2 लाख रिक्त पदे एका वर्षात भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तेलंगाणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देऊ.

शहीद जवानांच्या पालकांना किंवा त्यांच्या पत्नींना 25 हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाईल. शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षांवरील मुलींना इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाईल. राज्यातील प्रत्येक झोनमध्ये कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येतील.

प्रियंकांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे...

या धरणीसाठी शेकडोंचे बलिदान

तुम्ही तेलंगाणाला माता म्हणता. हे राज्य तुमच्यासाठी फक्त जमिनीचा तुकडा नाही किंवा नकाशावर रेखाटलेली रेघ नाही. ही धरणी आहे जिला तुम्ही माता मानता. या धरणीसाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले. माझ्या कुटुंबानेही अनेक बलिदान दिले आहेत, इंदिरा अम्मा देशासाठी शहीद झाल्या. त्यागाचा अर्थ आम्हाला माहीत आहे, माझी आई सोनियांना तुमचा मुद्दा कळला, निर्णय अवघड होता, तरीही आम्ही राजकारणाचा विचार केला नाही.

सरकारला वाटते, तेलंगाणा त्यांची जहागिरी आहे

देशासाठी आणि तेलंगाणासाठी शहीद झालेल्या लोकांचे स्वप्न होते की राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. हुतात्म्यांचा नारा होता पाणी, निधी आणि रोजगार, पण आज राज्यात सत्ताधारी पक्षालाच पाणी मिळत आहे. त्यांना निधी मिळत आहे, सरकारच्या जवळच्या लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. केसीआर सरकार तेलंगाणातील लोकांची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीये. त्यांना वाटतं की हा प्रदेश त्यांची जहागिरी आहे आणि ते त्याचे नवे मालक आहेत. त्यांना इथून हाकलून द्या.

राज्यात दररोज ३ शेतकरी आत्महत्या

तेलंगाणातील अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड लाखांचे कर्ज आहे. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 2014 पासून आतापर्यंत 8 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. केसीआर सरकार स्थापन होण्यापूर्वी ते म्हणायचे की आम्ही प्रत्येक घराला रोजगार देऊ, तुमच्या घरात नोकरी मिळाली का? बेरोजगार तरुणांना दरमहा 3000 रुपये भत्ता देऊ, असे सांगण्यात आले, तुम्हाला भत्ता मिळाला का?

माझी तुलना इंदिराजींशी करून तुम्ही मला माझ्या जबाबदारीची आठवण करून दिली

राज्यात 2 लाख सरकारी नोकऱ्यांची पदे रिक्त आहेत. PPSC चा पेपर फुटला, काही कारवाई झाली? विद्यमान सरकारने गेल्या पाच वर्षांत एकही सरकारी विद्यापीठ बांधले नाही. खासगी विद्यापीठ सुरू केले आहे, परंतु गरीब कुटुंब त्याची फी भरू शकत नाही. शिक्षणाचे बजेटच कमी झाले आहे. तुमच्या मोठ्या स्वप्नांचे काय झाले, ज्यासाठी तुम्ही नवीन राज्य निर्माण केले होते. सरकारने तुमची स्वप्ने मोडली. आता तुम्हाला ठरवायचे आहे. तेलंगणात काही महिन्यांवर निवडणूक आहे.

आजी इंदिराजी यांच्याशी तुलना करून जबाबदारीची जाणीव करून दिली

तुम्ही लोक मला पाहता आणि म्हणता की मी इंदिरा अम्मासारखी दुसरी इंदिरा अम्मा आहे. यामुळे मला जबाबदारीची जाणीव होते. त्या 40 वर्षांपूर्वी देशासाठी शहीद झाल्या, पण आजपर्यंत तुम्ही त्यांची आठवण ठेवली, त्यांचा आदर केला. तुम्हा लोकांना माझ्यात इंदिरा गांधी दिसतात, त्यामुळे मी इथे खोटी आश्वासने देणार नाही ही माझी जबाबदारी आहे. तेलंगाणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सर्व आश्वासने पूर्ण केली जातील.