आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi To Contest Elections; Weekly Tour Of 5 Districts, Headquartered In Lucknow

मिशन यूपी:प्रियंका निवडणूक लढणार; 5 जिल्ह्यांचा दर आठवड्याला दौरा, लखनऊमध्ये होतेय मुख्यालय

नवी दिल्ली / मुकेश कौशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाचा विडा प्रभारी सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्वत: उचलला आहे. वाराणसीमध्ये १० ऑक्टोबरला प्रचार मोहिमेच्या सुरुवातीनंतर कार्यसमितीच्या शनिवारच्या बैठकीत प्रियंका गांधींनी आपले मुख्यालय लखनऊला घेऊन जात असल्याचे जाहीर केले. यासोबत त्यांनी रणनीतीचा आराखडा सादर करत सांगितले की, निवडणूक होईपर्यंत उत्तर प्रदेशातच राहणार आहे. दर आठवड्यास ५ जिल्ह्यांचा दौरा करतील. शीला कौल यांच्या लखनऊ येथील बंगल्यास प्रियंकांच्या वॉररूमध्ये रूपांतरित केले जात आहे. येथूनच निवडणूक रणनीतीचे संचालन होईल. प्रियंका यांचा स्टाफ दिल्लीहून लखनऊला शिफ्ट होत आहे. १४ नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या कौल यांच्या निवासास काँग्रेस निवडणूक मुख्यालय जाहीर केले जाईल.

नुकतेच लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रियंकांनी ज्या पद्धतीने काँग्रेसी हल्ल्याचे नेतृत्व सांभाळले, त्यामुळे राज्यात पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रियंका सतत उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहेत.

सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीशी संबंधित राजकीय विश्लेषक संजयकुमार म्हणाले, १०% पेक्षाही कमी मतहिस्सा आणणाऱ्या काँग्रेसचे पुनरागमन खडतर आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस शेतकरी मतपेढी अजमावत असली तर त्याचा फायदा मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...