आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला आली भगवान रामाची आठवण:प्रियंका गांधींनी 21ओळींमध्ये 23 वेळा घेतले रामाचे नाव, म्हणाल्या- राम सर्वात आहे, राम सर्वांचे आहेत

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • कमलनाथ यांनी भगवे कपडे घातलेला फोटो ट्विटर प्रोफाइलला लावला

राम मंदिराच्या भूमीपूजनाला 24 तासांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. प्रत्येकजण राम नामात मग्न झाला आहे. त्या काँग्रेसलाही रामाची आठवण येत आहे, जी खुल्या मंचावर या नावापासून दूर पळायची. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वधेरा यांनी मंगळवारी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी 21 ओळींमध्ये 270 शब्द लिहीले आहेत आणि यात 23 वेळा रामाचे नाव घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, नेहमी इंग्रजीत स्वाक्षरी करणाऱ्या प्रियंका यांनी यावेळीस हिंदीमध्ये स्वाक्षरी केली आहे.

प्रियंका यांनी ट्वीटमध्ये लिहीले, राम सर्वात आहेत, राम सर्वांचे आहेत. राम कबीरचे आहेत, तुलसी दास यांचे आहेत आणि रैदास यांचेही आहेत.

भगव्या रंगात कमलनाथ यांनी सुंदर कांडचे पठण केले, चांदीच्या वीटा अयोध्येत पाठवतील

फक्त प्रियंकाच नाही, तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनीदेखील ट्विटर प्रोफाइल फोटो बदलली आहे. यात त्यांनी त्रिपुंड तिळा लावून भगव्या रंगातील कपडे घातलेला फोटो टाकला आहे.

कमलनाथ यांनी सुंदर कांडाचे पठण केले आणि म्हटले की, आम्ही राम मंदिर निर्माणाचे स्वागत करतो. राजीव गांधींनी 1985 मध्ये याची सुरुवात केली होती. 1989 मध्ये शिलान्यास झाला. राजीव जी यंच्यामुळे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. यादरम्यान, कमलनाथ यांनी घोषणा केली आहे की, 11 चांदीच्या वीटा ते अयोध्येत पाठवणार आहेत.

सुरजेवाला यांनी आठवण करुन दिली रामाची मर्यादा

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणाला फक्त 24 तास बाकी आहेत, अशात मला कोणतेही राजकीय विधान करायचे नाही. इतकच म्हणून इच्छितो की, राजकारणाचा धर्म असावा, धर्माचे राजकारण नसावे. हीच रामाची मर्यादा आहे.