आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi UP Assembly Election | Prashant Kishor | Congress Priyanka Gandhi Likely To Contest From Amethi

प्रियंका लढवणार विधानसभा:​​​​​​​रायबरेली किंवा अमेठीमधून मैदानात उतरण्याची तयारी, विधानसभा निवडणूक लढणाऱ्या गांधी घराण्यातील पहिल्याच सदस्य

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंकाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली

काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा पुढील वर्षी होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणुकीत रायबरेली किंवा अमेठीमधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. असे झाल्यास, प्रियंका या विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या गांधी कुटुंबातील पहिल्या सदस्य असतील. यापूर्वी गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी फक्त लोकसभा निवडणूक लढवली आहे.

सुत्रांचे म्हणणे आहे की, प्रियंकाची पहिली पसंती अमेठी आहे, कारण त्यांना राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करायचे आहे. जेणेकरून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींना आव्हान दिले जाऊ शकते.

प्रशांत किशोर यांनीही प्रियंका यांना दिली आहे सूचना
गेल्या काही दिवसांपूर्वी लखनौ येथे झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने प्रियंका यांना असेही सांगितले होते की, त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नवी ताकद मिळेल. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही प्रियंका यांना सुचवले होते की त्यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले पाहिजे.

प्रियंकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली
प्रियंका गांधींनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत किंवा नाही याबद्दल कोणतेही संकेत दिले नाहीत, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांच्या कार्यालयातून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यासाठी रायबरेली आणि अमेठीचा डेटा गोळा केला जात आहे.

रायबरेली किंवा अमेठी का?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींच्या पराभवानंतर गांधी कुटुंबाचे वर्चस्व कमी झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रायबरेलीतील गांधी परिवाराचा जनतेशी असलेला संपर्कही कमी झाला आहे.

अशा स्थितीत अमेठी आणि रायबरेली भागातील लोकांशी काँग्रेसचे संबंध प्रियंका यांच्या निवडणुकीमुळे अधिक मजबूत होऊ शकतात. रायबरेली आणि अमेठी हे वर्षानुवर्षे गांधी घराण्याचे गड आहेत आणि प्रियंका यांना हे नाते कमकुवत होऊ नये असे वाटते. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत प्रियंका काँग्रेसचा चेहरा असेल असे औपचारिकपणे सांगितले आहे.

निधी उभारण्यासाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशात नवीन मार्गही शोधला आहे. प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी एक परिपत्रक जारी केले आहे की, ज्याला तिकीट हवे असेल त्याला 25 डिसेंबरपर्यंत पार्टी फंडात 11,000 रुपये जमा करावे लागतील. तिकिटासाठी आधी अर्ज भरावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...