आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi Vadra। Congress General Secretary Priyanka Clean Up Camp In Lucknow After Yogi Adityanath Remarks

काँग्रेसची गांधीगिरी:झाडू लावल्याने योगींनीनी केली होती टीका, प्रियंकांनी पुन्हा हातात झाडूच घेऊन दिले उत्तर; म्हणाल्या- योगींची मानसिकता जातीयवादी, दलितविरोधी

लखनऊ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला गांधीगिरीतून उत्तर दिले आहे. लखीमपूर दौऱ्यावर जाताना ताब्यात घेतले तेव्हा प्रियंकांनी झाडू लावत आपला विरोध व्यक्त केला होता. त्यावरून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली होती. त्यालाच उत्तर देताना प्रियंका यांनी शुक्रवारी सायंकाळी लखनऊ येथील एका दलित वस्तीमध्ये वाल्मिकी आश्रम येथे पोहोचून झाडू लावला. रोज कोट्यावधी महिला झाडू लावतात हे स्वाभीमान आणि साधेपणाचे प्रतिक आहे असे प्रियंका म्हणाल्या.

प्रियंका पुढे म्हणाल्या, योगी आदित्यनाथ यांनी झाडूबद्दल विधान करून त्यांची जातीयवादी आणि दलितविरोधी मानसिकता दाखवली. देशातील करोडो महिला रोज झाडू लावतात. भारत त्यांचा अपमान सहन करणार नाही. याच प्रकारे शनिवारी सुद्धा उत्तर प्रदेशातील महिला काँग्रेसच्या सदस्य भगवान वाल्मिकी आश्रमाची साफ सफाई करणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी बोलताना सीतापूरच्या गेस्ट हाउसमध्ये प्रियंकांनी लावलेल्या झाडूची आठवण काढली. जनतेने त्यांना (प्रियंकांना) त्याच कामाच्या लायकीचे करून ठेवले आहे. त्यांच्याकडे अस्थिरता आणि नकारात्मकता पसरवण्यापेक्षा दुसरे काहीच काम नाही.

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर प्रियंका गांधी 3 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे पोहोचल्या होत्या. येथून त्या लखीमपूरला जाणार होत्या. परंतु, 4 ऑक्टोबर रोजी पहाटेच त्यांना सीतापूर येथे थांबवण्यात आले. यानंतर त्यांना एका गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद करण्यात आले. याच गेस्ट हाऊसमध्ये झाडू लावल्याचा प्रियंका गांधी वाड्रा यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.

बातम्या आणखी आहेत...