आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधींचे आश्‍वासन:हिमाचलमध्ये 1 लाख नाेकऱ्या देऊ

कांगडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस सत्तेवर आल्यास हिमाचल प्रदेशात १ लाख नाेकऱ्या दिल्या जातील. त्याशिवाय जुनी निवृत्ती याेजनाही पूर्ववत केली जाईल. प्रत्येक महिलेला महिन्याला १५०० रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले. त्या जाहीर सभेत बाेलत हाेत्या.

प्रियंका म्हणाल्या, राज्यातील तरुणाईला पाेखरणारे ड्रगचे उच्चाटन केले जाईल. त्यासाठी ड्रग माफियांच्या विराेधातही कारवाई केली जाईल. पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक मतदारसंघात इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली जाईल. राज्यात सध्या ६३ हजारांवर सरकारी पदे रिक्त आहेत. त्यास राज्य सरकार जबाबदार असल्याची टीकाही प्रियंका यांनी केली. परंतु आमचे सरकार आल्यास पाच वर्षांत ५ लाख नाेकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

महिलांवर ओझेही मला समजू शकते. म्हणूनच महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये मदत देण्याचीही आम्ही याेजना आणणार आहाेत. त्याला ‘हर घर लक्ष्मी याेजना’ असे नाव दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...