आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात येण्याची आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बेनामी मालमत्ता प्रकरणात सलग दोन दिवस चौकशीनंतर त्यांचे हे विधान समोर आले. वाड्रा म्हणाले की, राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. राजकारणात नसतानाही राजकीय लढाई लढत आहेत. जेव्हा जेव्हा सरकार संकटात असते तेव्हा माझा वापर पंचिंग बॅग म्हणून केला जातो, अशा शब्दांत वाड्रा यांनी सरकारवर टीका केली.
रॉबर्ट वड्रा यांनी गुरुवारी IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. वाड्रा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि अमेठीत प्रचार केला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मुरादाबादमध्ये वाड्रा यांच्यासाठी होर्डिंग्स देखील लावण्यात आले. यावर आपले बालपण या ठिकाणी गेले होते आणि मी इथेच रहावे अशी इथल्या लोकांनी इच्छा होती असा दावा वाड्रा यांनी केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.