आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांसाठी प्रियंकांचा महामृत्युंजय जप:आई गत 7 दिवसांपासून रुग्णालयात, प्रियंकांची उज्जैनमध्ये पूजा, 11 दिवस चालणार विधी

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आरोग्यासाठी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत आहे. सोनियांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांची कन्या मुलगी तथा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी हा जप करत आहेत.

त्याची सुरुवात शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सत्यनारायण पटेल व इतर काँग्रेस नेत्यांनी पूजाअर्चा करुन केली. 5 पंडितांच्या मदतीने सुरू असलेला हा विधी सलग 11 दिवस चालेल. 2 जून रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

त्यांच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात इन्फेक्शनही झाले आहे. नाकातून रक्त आल्यानंतर 12 जून रोजी त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर प्रियंकांनी आईच्या उत्तम आरोग्यासाठी महाकाल मंदिरात महामृत्युंजय जाप करण्यास सांगितले होते. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवी शुक्ला, रघु परमार आणि राष्ट्रीय सचिव सत्यनारायण पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रार्थना करून विधीची सुरुवात केली. ती पूर्ण झाल्यानंतर प्रियंका उज्जैनला येऊ शकतात.

प्रियंकांच्या सूचनेनुसार पूजा

काँग्रेस नेते रवी शुक्ला म्हणाले की, पक्षाध्यक्ष सोनियांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर प्रियंकांचा एक संदेश आला होता. त्यात त्यांनी महाकाल मंदिरात महामृत्युंजयाचा जप करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली. महाकालेश्वर मंदिरात यापूर्वीही अनेकदा व्हीव्हीआयपी लोकांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजयसह इतर पूजा करण्यात आल्या आहेत.

23 तारखेला ईडीपुढे हजेरी

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधींना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. यापूर्वी, ईडीने त्यांना 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु तत्पूर्वी 2 जून रोजीच सोनियांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेला हजर राहण्यासाठी नवी तारीख देण्यास सांगितले होते.

सोनिया-राहुल गांधींनी घेतले आहे महाकालचे दर्शन

2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी महाकाल दर्शनासाठी आले होते. येथे त्यांनी पूजा केली. राहुल यांच्यापूर्वी त्यांची आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी व आई सोनिया गांधी यांनीही महाकालचे दर्शन घेतले आहे. काँग्रेस अध्यक्ष होण्यापूर्वी 5 ऑक्टोबर 2010 रोजी राहुल यांनी महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. तर सोनिया 20 जून 2008 रोजी येथे आल्या होत्या.

राहुल गांधी यांनी 2010 व 2018 मध्ये उज्जैनला येऊन महाकालचे दर्शन घेतले होते.
राहुल गांधी यांनी 2010 व 2018 मध्ये उज्जैनला येऊन महाकालचे दर्शन घेतले होते.

इंदिरा-राजीवही उज्जैनला आले

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 30 डिसेंबर 1979 रोजी महाकाल मंदिरात जाऊन बाबा महाकालची पूजा केली होती. असे मानले जाते की आणीबाणीनंतर त्यांची सत्ता गेली, तेव्हा 1979 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी इंदिराजींनी महाकालाला भेट दिली होती. त्यानंतर 1980 मध्ये त्या पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या. 1989 मध्ये राजीव गांधी यांनीही महाकाल मंदिराला भेट दिली होती.

सोनिया गांधी यांनी 2008 मध्ये उज्जैनला येऊन महाकालचे दर्शन घेतले होते.
सोनिया गांधी यांनी 2008 मध्ये उज्जैनला येऊन महाकालचे दर्शन घेतले होते.
बातम्या आणखी आहेत...