आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा डोळा जाट समुदायावर:बाजूने वळवण्यासाठी नेते मैदानात; सहारनपूरच्या शेतकरी महापंचायतीमध्ये प्रियंका गांधींचा सहभाग

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून विमानतळावर रुद्राक्ष माळा हातात घेऊन उभ्या असलेल्या प्रियंका. शाकंभरीदेवी मंदिरात त्यांनी पूजा केली. - Divya Marathi
डेहराडून विमानतळावर रुद्राक्ष माळा हातात घेऊन उभ्या असलेल्या प्रियंका. शाकंभरीदेवी मंदिरात त्यांनी पूजा केली.
  • राहुल राजस्थानातील जाटबहुल भागांत १२ व १३ रोजी घेणार सभा

शेतकरी आंदोलनातून निर्माण झालेल्या आक्रोशाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने उत्तर भारतातील चार प्रमुख राज्यांतील जाट समुदायबहुल भागांवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी बुधवारी उत्तर प्रदेशात सहारनपूरच्या चिलकाना येथे आयोजित महापंचायतीमध्ये सहभागी झाल्या. महापंचायतीला झालेल्या गर्दीमुळे काँग्रेस नेते समाधानी झाल्याचे दिसले. काँग्रेसने पूर्ण जनाधार गमावलेला हाच मतदारसंघ आहे. राहुल गांधीदेखील राजस्थानच्या जाटबहुल भागांत सभा घेण्यास सुरुवात करणार आहेत. श्रीगंगानगर व हनुमानगडमध्ये त्यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १२ व १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या सभा होतील. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने मार्चमध्ये सहभागी करून घेण्याची काँग्रेसची योजना आहे. हरियाणात काँग्रेसने पारंपरिक जाट मतांची एकजूट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांना मैदानात उतरवले आहे. पंजाबमध्येही पक्षाची हीच रणनीती आहे. जाट नेता राकेश टिकैत यांच्यावरील पोलिस कारवाईदरम्यान भावुक होण्याच्या घटनेमुळे समुदायात आक्रोश आहे. अजितसिंह व त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्या लोकदल व काँग्रेसने त्यांच्यावर डाव खेळला आहे.

शेतकरी, जाट, मुस्लिम समुदायाची मते मिळवण्यासाठी व्यूहरचना

एका पाहणीनुसार गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ७० ते ८५ टक्के मत जाट समुदायाने भाजपच्या बाजूने टाकली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २० टक्क्यांहून कमी एवढा जाट समुदायाच्या मतदारांचा भाजपला पाठिंबा होता.

भाजपने २०१७ च्या निवडणुकीत त्यापैकी ३७ जागी विजय मिळवला होता. ही मते काँग्रेस-रालोद आघाडीसोबत गेल्यास अल्पसंख्याक मतांच्या जोरावर बळकट समीकरण तयार होईल, असे काँग्रेसला वाटते.

भाजपला जाट मते मिळाली नाही तर भाजपचे मोठे नुकसान होऊ शकते. पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला ४३.६ टक्के मते मिळाली होती. राज्यातील एकूण मतांपैकी हे प्रमाण दोन टक्क्यांनी जास्त होते.

राजस्थानातही जाट सर्वात मोठा जातीय गट

राजस्थानातही ९ टक्के मतांसह जाट समुदाय सर्वात मोठा जातीय गट आहे. राज्यात २०० सदस्यीय विधानसभेत किमान ३७ जागां जाटबहुल आहेत. मारवाड व शेखावटी क्षेत्रातील ३१ जागांवर २५ जाट नेते विजयी झाले. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. पक्ष विधानसभेबरोबर लोकसभेतदेखील ही मते जोडू इच्छितो.

मोदींची मित्रांसाठी तळमळ : प्रियंका

महापंचायतीमध्ये प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. मोदींचे मन शेतकऱ्यांसाठी नव्हे तर अब्जाधीश मित्रांसाठी तळमळते. शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी देण्यासाठी त्यांच्याकडे १५ हजार कोटी रुपये नाहीत. परंतु १६ हजार कोटींची व्हीव्हीआयपी विमान खरेदी केली जात आहे. २० हजार कोटी नवीन संसद भवन तयार करण्यासाठी खर्च केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...