आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिमाचलमधील निवडणूक प्रचार गुरुवारी संपला. शेवटच्या दिवशी भाजपने हुंकार दिला, तर काँग्रेसने भावनिक कार्ड खेळले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी तीन सभा घेतल्या. त्या म्हणाल्या, माझ्या आजी इंदिरा गांधींच्या काळात वेगळे राजकारण होते, आज वेगळे आहे. माझे घर हिमाचल आहे, मी हिमाचली आहे...जयराम सरकारने ५ वर्षात राज्याला कर्जात बुडवण्याचेच काम केले आहे. राज्यावर ७० हजार कोटींचे कर्ज आहे.
नड्डा म्हणाले- भाजप मिशनसाठी काम करते, तर काँग्रेस कमिशनसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फतेहपूरमधील रॅलीत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले भाजप देशाच्या संपूर्ण विकासासाठी एका मिशनप्रमाणे काम करते तर काँग्रेस कमिशनसाठी काम करते. दोन्ही पक्षांत हाच फरक आहे. नड्डा म्हणाले की, ते राजकारण टाळ्यांच्या कडकडातून ओळखून घेतात.
आनंद शर्मा म्हणाले- प्रचार अधिक चांगला झाला असता काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आपल्याच पक्षावर टीका केली. म्हणाले, हिमाचलसाठी पक्षाकडून प्रचारात वरिष्ठ नेत्यांना सहभागी करत अधिक चांगले करता आले असते. शर्मा यांनी यावर खंत व्यक्त करत पक्षाने त्यांच्या सेवा पूर्ण घेतल्या नसल्याचे सांगितले. ते असेही म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष नव्या पेन्शन योजनेच्या फायद्यांचा अभ्यास न करण्यास जबाबदार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.