आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Congress Government Crisis, Ashok Gehlot VS Sachin Pilot In Rajasthan Live News And Updtes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गहलोत विरुद्ध पायलट:गहलोत यांच्यासोबत काम करू इच्छित नाहीत पायलट समर्थक आमदार! दिल्ली, हरियाणातील हॉटेलमध्ये मुक्कामी; हे आहे नाराजीचे कारण

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 15 काँग्रेस, अपक्ष आमदारांसह 15 भाजप नेते सुद्धा पायलट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा

राजस्थानात सरकार पाडण्याच्या कटकारस्थान आणि आमदारांच्या खरेदीचे आरोप होत असताना रविवारी राजकीय हालचालींना वेग आले. राजस्थानपासून दिल्लीपर्यंत बैठका होत आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट आपल्यासोबत 12 काँग्रेस आमदार आणि 3 अपक्ष आमदार घेऊन दिल्लीच्या हॉटेलात असल्याचे कळते. काही आमदार हरियाणातही थांबल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. नाराज काँग्रेस आमदार आपली कैफियत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर मांडू शकतात. यासाठी त्यांनी सोनिया गांधींचा वेळ मागितला आहे.

आमदारांच्या घोडेबाजार संदर्भात ठोठावण्यात आलेल्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) च्या नोटिसवरून पायलट नाराज आहेत असे सांगितले जात आहे. यासंदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. एसओजीने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काही मंत्र्यांना देखील नोटिस बजावली. परंतु, ही एक सामान्य प्रक्रिया आहे असा दावा गहलोत करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एसओजीच्या याच नोटिसमुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये संताप आहे. सरकारने आपल्या सीमा ओलांडल्या आता त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही असेही काही नाराज आमदारांचे म्हणणे आहे.

15 भाजप आमदारांचा देखील पाठिंबा?

सचिन पायलट यांना काँग्रेस आणि अपक्ष अशा 15 आमदारांचा पाठिंबा आहेच. यासोबतच, ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना भाजपचे 15 आमदार पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे, त्यांनीच सरकार पाडावे असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपने सत्तापालट झाल्यास मुख्यमंत्री पद गमावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याच दरम्यान, गहलोत यांनी आज रात्री जयपूर येथील निवास स्थानी मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे.

सकाळपासूनच अॅक्शन मोडमध्ये मुख्यमंत्री गहलोत

अशोक गहलोत सकाळळपासूनच राजकीय परिस्थितीमुळे सक्रीय आहेत. ते सलग आमदार आणि मंत्र्यांच्या बैठका घेत आहेत. राजस्थानचे परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितल्याप्रमाणे, "कॅबिनेटच्या बैठकीमध्ये गहलोत यांनी सांगितले आहे की कुठल्याही मंत्री किंवा आमदाराचा फोन बंद आल्यास किंवा संपर्कात नसल्यास घाबरू नये. सरकार टिकवण्याची जबाबदारी सर्वांची आहे."

हे आमदार दिल्लीत

सुरेश टांक, महेंद्रजीत सिंह मालवीय, ओम प्रकाश हुडला, राजेंद्र बिधुडी, पीआर मीणा, रोहित बोहरा, चेतन डूडी आणि दानिश अबरार दिल्लीला पोहोचले आहे. तर उर्वरीत आमदारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. भास्करशी संवाद साधताना या सर्वांनी आपल्या वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीत असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...