आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Proceedings Of Both The Houses Of Parliament Can Start From 11 Am, Prime Minister Modi Will Hold An All Party Meeting Late In The Evening; News And Live Updates

पावसाळी अधिवेशनचा दुसरा दिवस:संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणावरून गदारोळ; हे स्पायवेअर इस्त्राईलकडून खरेदी करण्यात आले होते का? - विरोधी पक्ष

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. हेरगिरी प्रकरणातील विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचा कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. विरोधकांनी सरकारला पेगासस स्पायवेअर प्रकरणावरुन चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, 12 वाजेनंतर संसदेचे राज्यसभा सभागृह सुरु करण्यात आले.

परंतु, विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे ते काही वेळासाठी पुन्हा स्थगित करण्यात आले आहे. हे स्पायवेअर इस्त्रालयकडून खरेदी करण्यात आले का? ही विचारणा विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

नोटाबंदीप्रमाणेच लॉकडाउनही तयारीशिवाय लावले - खरगे
केंद्र सरकारने लॉकडाऊन लावताना कोणतीही पुर्वतयारी केली नव्हती. मोदी सरकाने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय नोटबंदीसारखा घेतला असल्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांचे हाल झाले आहे.

काँग्रेसला स्वत:ची कमी आणि भाजपची चिंता जास्त - पंतप्रधान मोदी
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. दरम्यान, बैठकीत पंतप्रधान मोदी आपल्या पक्षातील नेत्यांना सांगितले की, सत्याला वारंवार जनतेपर्यंत पोहोचवा, सरकारच्या कामाबद्दल लोकांना सांगा. काँग्रेस पक्ष सर्वत्र संपत चाललेला असून त्यांना आपल्यापेक्षा भाजपची जास्त चिंता असल्याचा टोला मोदी यांनी यावेळी लगावला.

मोदी पुढे म्हणाले की, कोरोना आपल्यासाठी राजकारणाचा नसून तो मानवतेचा विषय आहे. यापूर्वीच्या महामारीत लोक महामारीने कमी आणि भूकेने जास्त मरायचे. परंतु, आपल्या सरकारने तसे होऊ दिले नाही असे मोदी यांनी सांगितले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, लसीकरण केंद्रावर जाऊन लोकांना पंतप्रधानांच्या 'मन की बात' ऐकवा. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहोचवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नड्डा यांनी आपल्या पक्षातील खासदारांना धार्मिक नेत्यांची भेट घेण्यास सांगितले आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतून सामाजिक अंतर आणि मास्कचा संदेश देण्यात आला.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतून सामाजिक अंतर आणि मास्कचा संदेश देण्यात आला.

संसदेत आज हेरगिरी प्रकरणावरुन गदारोळ होण्याची शक्यता
विरोधी पक्षांनी सरकारला पेगासस सॉफ्टवेअर प्रकरणावरुन चांगलेच धारेवर धरले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळे संसदेचे दोन्ही सभागृह मंगळवार सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले होते. परंतु, आतादेखील या प्रकरणावरुन जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांनी सभागृहाच्या कारवाईसंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत बैठक घेतली.
विरोधी पक्षांनी सभागृहाच्या कारवाईसंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत बैठक घेतली.

लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र - आयटी मंत्री वैष्णव
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रविवारी रात्री एका वेब पोटर्लने अतिशय खळबळजनक स्टोरी प्रकाशित केली होती. ज्यामध्ये सरकारवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होण्याच्या एक दिवसाआधी ही स्टोरी समोर आली आहे. त्यामुळे हे काही योगायोग असू शकत नाही असे वैष्णव यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही व्हॉट्स अॅपवर पेगाससच्या वापरासंदर्भांत असेच दावे करण्यात आले होते. परंतु, ते सर्व दावे निराधार असल्याने त्याला सर्वांनी नाकारले. 18 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात भारताच्या लोकशाहीची आणि इतर संस्थांची प्रतिमा डागळण्याचे प्रयत्न दिसत असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे.

हेरगिरी आणि बेकायदेशीर पाळत ठेवण्याविरूद्ध कठोर कायदे
आपल्या देशात हेरगिरी आणि बेकायदेशीर पाळत ठेवण्याविरूद्ध आपल्या देशात कठोर कायदे आहे. त्यामुळे देशांतग्रत असे करण्यासाठी एक प्रणाली असल्याचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचे निरीक्षण करताना नियम व कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

भारतीय टेलीग्राफ कायदा 1885 च्या कलम (2) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार इलेक्ट्रॉनिक संप्रेषण रोखले जाऊ शकते, परंतु सक्षम प्राधिकरणाने मंजूर केल्यानंतरच असे करता येईल.

बातम्या आणखी आहेत...