आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:प्रा. डॉ. चोरडियांना ‘द ग्लोबल एज्युकेशनिस्ट ऑफ द इयर’पुरस्कार जाहीर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉरिशस सरकारच्या शिक्षण मंत्रालय व इंटेलिजन्स माईंड ट्रस्ट, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘द ग्लोबल एज्युकेशनिस्ट ऑफ द इअर’ पुरस्कार सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना जाहीर झाला आहे. ५ ते ८ ऑक्टोबर २०२२ या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. येत्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) मॉरिशस येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपन यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उप-पंतप्रधान लीला देवी दुकून, परराष्ट्र व्यवहार मंत्री अॅलन गानू उपस्थित राहणार आहेत. ‘सूर्यदत्त’ परिवाराने आपल्या कुटुंबप्रमुखाला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न ग्लोबल कोच अशी जगभर ओळख असलेले प्रा. डॉ. संजय चोरडिया पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...