आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधित पीएफआयला फंडिंग:अतिरेकी संघटनेचे लागेबांधे दुबईपासून कतारपर्यंत, आखाती देशांतून हवालामार्गे मिळतो पैसा

नवी दिल्ली / पवनकुमार8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी कारवायांत सहभागी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर(पीएफआय) देशात ६ महिन्यांपासून बंदी आहे. सुरुवातीस त्याला अन्य देशांतून देणगीच्या स्वरूपात पैसे मिळत होते. यावर सरकारच्या प्रयत्नानंतरही त्याची फंडिंग बंद झाली नाही. आता निधी हवालामार्फत मिळत आहे. गुप्तचर सुरक्षा तपास संस्थेच्या सूत्रांनुसार, पीएफआयला संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई, अबु धाबी, कतार, कुवेत, येमेन, बहरीन आणि अनेक अन्य देशांतून सतत फंडिंग होत आहे. हा पैसा भारतात हवालाद्वारे पोहोचवला जातो. सूत्रांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामचा वापर पीएफआयचे सदस्य टेरर फंडिंग जमा करण्यासाठी करतात. संघटनेचे सदस्य या प्लॅटफॉर्मद्वारे अन्य देशांतील सदस्यांकडून पैसे मागतात. मागणीवर दुबई, अबुधाबी, कतार, कुवेत, येमेन, बहरीनसारख्या इस्लामिक देशांतून हवालाद्वारे पैसे भारतात पाठवले जातात. निधी प्राप्त करण्यासाठी एक विशेष कोड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा डार्क वेबच्या माध्यमातून भारताती रिसिव्हरकडे पाठवला जातो. यासोबत रिसिव्हरला सांगितले जाते की, त्याने कुठे आणि केव्हा रक्कम घ्यायची आहे. सूत्रांनुसार, एक वेळ १० कोटी रु. रक्कम प्राप्त करण्यासाठी कोड होता की, दुबईहून जी १० किलो इमरती आली आहे, ती खायची आहे.

कोड मॅच झाल्यावर हवालाची रक्कम रिसिव्हरच्या ताब्यात दिली जाते. सूत्रांनुसार, हवाला नेटवर्कद्वारे जेव्हा पीएफआयला रिसिव्हरकडून रक्कम मिळते, तेव्हा ती सुरक्षित पद्धतीने संबंधित लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू होते. ज्यांना टेरर फंडिंग द्यायची आहे,अशा लोकांची नावे, बँक खात्यांचे क्रमांक आणि आयएफएससी कोडची माहिती जमा केली जाते. तपास संस्थांना फसवण्यासाठी दहशतवादी लोकांची माहिती प्राप्त केल्यानंतर बँक खाते असलेल्या १० ते २० गरीब लोकांची निवड केली जाते. त्यांना किरकोळ कमिशन दिले जाते.

१९ लोकांना आरोपी केले, आरोपपत्रात पीएफआयचेही नाव एनआयएने टेरर फंडिंग करणारी ७७ बँक खाती आतापर्यंत बंद केली आहेत. यापैकी ३७ बँक खाती पीएफआयच्या सक्रिय सदस्यांची होती. एनआयएने शनिवारी विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या पाचव्या आरोपपत्रात दिली आहे. ७७ बँक खाती गुवाहाटी(आसाम), सुंदीपूर(प. बंगाल), इंफाळ(मणिपूर), कोझिकोड(केरळ), चेन्नई(तामिळनाडू), नवी दिल्ली, जयपूर(राजस्थान), बंगळुरूसह(कर्नाटक) संपूर्ण भारतात या बँक खात्यांवर कारवाई केली. यात पीएफआयसह १९ लोकांना आरोपी केले आहे.

एनआयए हवाला नेटवर्कपर्यंत पोहोचले, मास्टरमाइंड अद्याप दूरच आरोपपत्रानुसार, पीएफआय देशातील मुस्लिम युवांची दिशाभूल करून देशाविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी चिथावणी देत होते. एवढेच नव्हे तर हे लोक संघटनेसोबत प्रामाणिक राहावेत यासाठी त्यांना २० हजार रु. मासिक वेतन देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर संस्थांच्या इनपुटवर एनआयएने कर्नाटक आणि केरळमध्ये याच हवाला नेटवर्कला ट्रेस केले. संस्थेने या नेटवर्कमधील पैसा पीएफआयपर्यंत पोहोचवणारे अतिरेकी इकबाल कादर, अब्दुल रफीक बयारी, सरफराज, आबिद आणि सिमन यांना अटकही केले आहे. मात्र,ज्या लोकांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले त्यातील बहुतांश लोकांना माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...