आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:कोरोना लसीबाबत अपप्रचार; अफवा रोखण्यासाठी केंद्राने राज्यांना दिला अलर्ट

नवी दिल्ली | पवनकुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लसीबाबत सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपप्रचार आणि अफवा रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच सर्व राज्यांना आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लसीबाबत चुकीची माहिती मिळाल्यास लसीच्या सामुदायिक स्वीकारार्हतेवर परिणाम होऊ शकतो. अशी स्थिती रोखण्यासाठी राज्यांनी एक मजबूत संचार व्यवस्था तयार करावी. त्यामुळे अफवा रोखल्या जाऊ शकतील. त्यासोबतच राज्यांना सूक्ष्म स्तरावर लसीकरणाच्या तयारीसाठी त्रिस्तरीय व्यवस्था तयार करण्यास सांगण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समिती स्थापन करण्यात यावी, राज्यांच्या प्रधान सचिवांच्या (आरोग्य) अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर टास्क फोर्स तयार करावा, असेही सांगितले आहे.

आधी यांना दिली जाईल लस
कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर आघाडीवर काम करणाऱ्या कामगारांना दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येईल.