आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वर्क फ्रॉम होम-मास्कचा फायदा घेत कॉस्मेटिक सर्जरींचा सुकाळ; इंग्लंडमध्ये वेट लॉस, तर द. कोरियात नाकाच्या शस्त्रक्रिया वाढल्या

लंडन/सेऊल/बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरू ते इंग्लंडपर्यंत सौंदर्य शस्त्रक्रियांत वाढ, द. कोरियात सरकारच्या पैशांचा वापर

कोरोनाच्या संकटकाळातही अनेकांनी संधी शोधली आहे. बंगळुरू ते इंग्लंडपर्यंतची जनता वर्क फ्रॉम होम व मास्कचा फायदा घेत स्वत:ला सुंदर करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेत आहेत. इंग्लंडमध्ये लोक पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिपोसक्शनसारखी शस्त्रक्रिया करत आहेत. याचे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे, त्यांना यासाठी वेगळी सुटी घेण्याची गरज भासत नाही तसेच वर्क फ्रॉम होम करत ते रिकव्हरही होत आहेत. दुसरा म्हणजे, शस्त्रक्रिया केल्याचे सहकाऱ्यांपासून लपवताही येते. आपल्याकडील शस्त्रक्रियांत ५००% वाढ झाल्याचा दावा दवाखान्यांनी केला आहे.

ब्रिटिश असोसिएशन ऑफ अॅस्थेटिक प्लास्टिक सर्जन्सचे डॅन मार्श यांच्यानुसार येत्या ९ महिन्यांतील सर्व स्लॉट बुक आहेत. पॉल मॉल कॉस्मेटिक्सनुसार, लिपोसक्शनच्या चौकशीत लॉकडाऊनच्या आधीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. पोट कमी करण्याची चौकशी ४०% वाढली आहे. पुरुष मंडळी छातीवरील चरबी करण्याचीही शस्त्रक्रिया करत आहेत. त्याची मागणी ११५% वाढली आहे. ब्रेस्ट सर्जन रामचंद्रन प्रसाद यांच्यानुसार, ब्रेस्ट रिडक्शन व टमी टक्स सर्जरीनंतर व्यक्ती ४-६ आठवड्यांत रिकव्हरही होते. ब्रेस्ट रिडक्शनबाबतची चौकशी ५२०%, तर ब्रेस्ट ऑग्मेंटेशनबाबत ११०% वाढली आहे.

दुसरीकडे द. कोरियात युवतींत नाकाच्या शस्त्रक्रियेकडे कल वाढला आहे. मास्कच्या खाली खुणा लपतील म्हणून आताच त्या शस्त्रक्रिया करवून घेत आहेत. द. कोरियाला कॉस्मेटिक सर्जरीची राजधानी म्हटले जाते. देशातील सर्वात मोठा ऑनलाइन कॉस्मेटिक सर्जरी प्लॅटफॉर्म गंगनम उन्नीनुसार तेथे २०२० मध्ये यावर ८० हजार कोटी रुपये खर्च झालेत. ही बाजारपेठ २०२१ पर्यंत ८७ हजार कोटींवर जाऊ शकते. अनेकांनी सरकारकडून मिळालेल्या रकमेचा यासाठी वापर केला. सरकारने ९५८३० कोटी रुपये दिले. त्यातील १०.६% रक्कम अशा शस्त्रक्रियेत वापरल्याचे आकडेवारीत दिसते.

संकटात संधी : आधी आठवड्यात तीन शस्त्रक्रिया, आता दिवसात तीन
भारतातही वेगळे चित्र नाही. बंगळुरूतील डॉ. वेप्पालापती यांच्यानुसार डिसेंबरपर्यंत आम्ही एका आठवड्यात तीन शस्त्रक्रिया करायचो. १ जानेवारीनंतर रोज तीन शस्त्रक्रिया करत आहोत. केस प्रत्यारोपण, रिनोप्लास्टी, बॉडी स्कल्पटिंग, चरबी कमी करणे तसेच बोटॉक्स, फिलर आणि फेशियल मेकओव्हरचीही मोठी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...