आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Protest Against Action : Rajya Sabha Deputy Chairman Harivansh Brought Tea For The Rajya Sabha MPs Who Are Protesting Against Their Suspension

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेत प्रथमच असे आंदोलन:8 निलंबित खासदारांचा रात्रभर ठिय्या, सकाळी उपसभापती चहा घेऊन गेले तर खासदारांनी दिला नकार; मोदी म्हणाले - हरिवंशजी मोठ्या मनाचे

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
निलंबित खासदारांचे ठिय्या कायम आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सकाळी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते - Divya Marathi
निलंबित खासदारांचे ठिय्या कायम आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सकाळी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते
 • राज्यसभेत कृषी बिलांविरोधात गदारोळ घातल्यामुळे 8 खासदार संपूर्ण सत्रासाठी निलंबित
 • यात काँग्रेसचे 3, तृणमूल आणि सीपीआयचे 2 तर आपच्या एका खासदाराचा समावेश

कृषी विधेयकांवर राज्यसभेत रविवारी झालेल्या गदारोळावर सभापती व्यंकय्या नायडूंनी सोमवारी ८ विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले. निलंबनानंतर खासदारांचे संसदेत धरणे आंदोलन केले. त्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. आंदोलन अद्यापही सुरूच आहे. संसद संकुलात रात्रीच्या वेळी प्रदर्शन केल्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले. राज्यसभा उपसभापती हरिवंश आज सकाळी आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी चहा घेऊन गेले होते, मात्र खासदारांनी चहा घेण्यास नकार दिला.

विशेष म्हणजे या खासदारांनी उपसभापतींसोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते. या खासदारांनी रविवारी कृषी बिलाविरोधात राज्यसभेत गदारोळ घातला होता. सदनातील नियमावली फाडली आणि माइक तोडण्याचा प्रयत्न केला होता.

मोदींनी 2 वेळा बिहारचा उल्लेख करत म्हटले - हरिवंशजींकडून प्रेरणा मिळते

पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले की, "काही दिवसांपूर्वी हरिवंश यांचा अपमान करुन त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांसाठी ते चहा घेऊन पोहोचले. यावरून हरिवंशजी किती विनम्र आणि मोठ्या मनाचे आहेत हे दिसते."

मोदींनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, "बिहारची महान भूमी शतकानुशतके आपल्याला लोकशाहीची मूल्ये शिकवत आहे. या सुंदर परंपरेला पुढे नेत बिहारचे खासदार आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश जी आम्हाला प्रेरणा देत आहेत. आज सकाळी त्यांनी जे केले, त्यामुळे लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गर्व होईल."

हरिवंश 24 तास उपवास ठेवतील

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सभापती व्यंकय्या नायडून यांना पत्र लिहिले आहे. विरोधकांनी सभागृहात केलेल्या अपमानाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. याचा विरोध म्हणून त्यांनी 24 तास उपवास करण्याची घोषणा केली आहे.

2 खासदारांचे वय 65 पेक्षा जास्त, मधुमेहाचा त्रासही आहे

धरणेवर बसलेल्या खासदारांनी आपाआपल्या घरून उशा आणि ब्लँकेटच नाही तर डास पळवणारे औषध देखील मागवले. आपत्कालीन परिस्थितीसाठी घटनास्थळावर रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कारण काँग्रेसचे रिपुन बोरा आणि भाकपचे ई करीम या दोन सहकाऱ्यांविषयी चिंता आहे. कारण दोघांचेही वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि दोघांनाही मधुमेहाचा त्रास आहे.

या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे

 • डेरेक ओ’ब्रायन- तृणमूल
 • डोला सेन- तृणमूल
 • रिपुन बोरा- काँग्रेस
 • राजीव सातव- काँग्रेस
 • सैयद नजीर- काँग्रेस
 • संजय सिंह- आप
 • ई करीम- सीपीआय
 • केके रागेश- सीपीआय
बातम्या आणखी आहेत...