आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Protests Across The Country Against BJP Leader Nupur Sharma, Latest News And Update

नुपूर शर्मांविरोधात देशभर निदर्शने:प्रयागराजमध्ये दगडफेक, निदर्शकांनी PAC चे वाहन जाळले; प. बंगालमध्ये पोलिसांचा गोळीबार

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात शुक्रवारी देशभर निदर्शने झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक व पश्चिम बंगालच्या अनेक शहरांत शुक्रवारच्या नमाजानंतर नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी नुपूर शर्मांविरोधात जोरदार नारेबाजी केली. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी पीएसीचा ट्रक जाळला. तर कर्नाटकात नुपूरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. झारखंडची राजधानी रांचीतही पोलिस व निदर्शकांत हिंसक झडप झाली.

दिल्ली पोलिसांनी गुरुवारीच नुपूरसह 33 जणांविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतही या प्रकरणी एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे. प्रेषितांचा अवमान केल्याप्रकरणी नुपूर यांना देशभरातून बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा प्रदान केली आहे.

पैगंबरांविषयीच्या टिप्पणीचे देशभर निदर्शने

1. उत्तर प्रदेश : नुपूरची जीभ कापणाऱ्यास 1 कोटीचे बक्षीस

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंदसह अनेक शहरांत शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसक निदर्शने झाली. सहारनपूरमध्ये तोडफोड, तर प्रयागराजमध्ये दगडफेक झाली. निदर्शकांनी पीएसीचा ट्रक जाळला. अनेक ठिकाणी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. भीम आर्मी चीफ सतपाल तंवर यांनी नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास 1 कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

2. दिल्ली : शाही इमाम म्हणाले, आम्ही निदर्शकांना ओळखत नाही

दिल्लीच्या जामा मशिदीपुढे नुपूर शर्मांविरोधात नारेबाजी करणारे निदर्शक.
दिल्लीच्या जामा मशिदीपुढे नुपूर शर्मांविरोधात नारेबाजी करणारे निदर्शक.

दिल्लीच्या जामा मशिदीत नमाजासाठी जवळपास 1500 लोक जमले होते. नमाजानंतर जवळपास 300 लोक बाहेर पडले. त्यांनी नुपूर यांच्याविरोधात नारेबाजी केली. जामा मशिदीचे शाही इमाम याविषयी म्हणाले, आम्ही निदर्शनाचे आवाहन केले नव्हते. नमाजी नमाज पठण करुन बाहेर पडले व अचानक निदर्शने सुरू केली. आम्ही त्यांना ओळखत नाही. माझ्या मते ते एमआयएमचे कार्यकर्ते किंवा ओवैसींचे समर्थक असावेत.

3. कर्नाटक : बेळगावात नुपूर शर्मांच्या प्रतिकात्मक पुतळा लटकवला

बेळगावात वीजेच्या तारेला नुपूर शर्मा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी.
बेळगावात वीजेच्या तारेला नुपूर शर्मा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी.

कर्नाटकच्या बेळगावात शुक्रवारी फोर्ड रोडवरील एका मशिदीलगतच्या वीजेच्या तारेला भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचा पुतळा लटकलेल्या स्थितीत आढळला. या प्रकरणी काहींनी हरकत घेतल्यानंतर पोलिसांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो काढून टाकला.

4. काश्मीर : श्रीनगरासह अनेक ठिकाणी निदर्शने

श्रीनगरच्या लालचौक भागातील निदर्शनांत पोस्टर दाखवताना आंदोलक. त्यात नुपूर यांच्याविषयी वादग्रस्त लिखान करण्यात आले होते.
श्रीनगरच्या लालचौक भागातील निदर्शनांत पोस्टर दाखवताना आंदोलक. त्यात नुपूर यांच्याविषयी वादग्रस्त लिखान करण्यात आले होते.

काश्मीरच्या श्रीनगरसह अनेक शहरांत नुपूर शर्मा यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. येथे नमाजानंतर लगेचच निदर्शने सुरू झाली. निदर्शकांनी नुपूर यांचा शिरच्छेद करण्यासंबंधीही नारेबाजी केली.

5. प.बंगाल : कोलकात्यातही निदर्शने, दगडफेक व गोळीबार

कोलकात्यातील पार्क सर्कस क्षेत्रातही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले
कोलकात्यातील पार्क सर्कस क्षेत्रातही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले

कोलकात्यातील पार्क सर्कस क्षेत्रातही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. यावेळी प्रेषितांविरोधात अवमानकारक विधान करणाऱ्या नेत्यांचे वाईट हाल करण्याची नारेजाबी करण्यात आली. जमावात सहभागी लोकांनी दुकाने बंद करण्याचाही प्रयत्न केला. त्यावरुन मोठा वाद उद्भवला. निदर्शकांनी अनेक वाहने व फायर ब्रिगेडच्या वाहनांची जाळपोळ केली. त्यानतंर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून फायरिंग करावी लागली.

6. झारखंड: रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक, गोळीबारही झाला

रांचीत निदर्शकांच्या दगडफेकीत पोलिस कर्मचारी जखमी झाला.
रांचीत निदर्शकांच्या दगडफेकीत पोलिस कर्मचारी जखमी झाला.

​​​​​​​रांचीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर निदर्शने केली. यावेळी गोंधळ आणि दगडफेक झाली. पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मेन रोडवरील इकरा मशीद ते डेली मार्केटपर्यंत दुकाने, याशिवाय हिंदपिढी, पुंदाग या मुस्लिमबहुल भागातही दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

7. तेलंगण : हैदराबादमधील मक्का मशिदीबाहेर निदर्शने

तेलंगणातही नमाजानंतर आंदोलकांनी गोंधळ घालण्यात आला. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजधानी हैदराबादमधील मक्का मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवले. परिसरात पोलीस दल आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहेत.

8. पंजाब : शाही इमामांच्या आवाहनावरून लुधियानात निदर्शने

प्रेषितांचा अनादर करणाऱ्यांना अटक करण्याच्या पंजाबच्या शाही इमामांच्या मागणीसाठी संपूर्ण पंजाबमध्ये निदर्शने झाली. हे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या आवाहनावर करण्यात आले. शुक्रवारच्या नमाजानंतर मजलिस अहरार इस्लाम हिंदतर्फे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. निदर्शक म्हणाले - पैगंबरांचा अपमान खपवून घेतला जाऊ शकत नाही.

9. मध्य प्रदेश: छिंदवाडामध्येही निदर्शने

मध्य प्रदेशातही नमाजनंतर मुस्लिम समाजातील लोकांनी नुपूर यांच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी करत निदर्शने केली. नुपूर शर्मा यांना मिळणाऱ्या धमक्यांवर खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या- या अश्रद्धावंतांनी हे नेहमीच केले आहे. त्यांचा कम्युनिस्ट इतिहास आहे. जसे कमलेश तिवारी काही बोलले की मारले गेले, कोणीतरी (नुपूर शर्मा) काही बोलले आणि त्यांना धमक्या आल्या. भारत हिंदूंचा आहे आणि सनातन धर्म इथे टिकेल आणि ही आपली जबाबदारी आहे.

10. महाराष्ट्र : अनेक शहरांमध्ये निदर्शने

महाराष्ट्रातील नवी मुंबई, पनवेल, सोलापूर, औरंगाबाद येथेही आंदोलने झाली आहेत. मात्र, येथून कोणत्याही हिंसाचाराचे वृत्त नाही. या निदर्शनांत महिला व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

11. गुजरात : लोक रस्त्यावर उतरले

निदर्शकांच्या हातात नुपूर शर्मा व जिंदल यांच्या अटकेची मागणी करणारे पोस्टर्स होते.
निदर्शकांच्या हातात नुपूर शर्मा व जिंदल यांच्या अटकेची मागणी करणारे पोस्टर्स होते.

वडोदरा आणि सुरतनंतर अहमदाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले. तणावाची परिस्थिती पाहता लाल दरवाजा आणि तीन दरवाजा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेचे पोस्टर हातात घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...