आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा बिगुल:अभिमानाने सांगतो, योगींनी यूपीला अव्वल स्थानावर नेले, गृहमंत्री शहांनी केली प्रचार मोहिमेची सुरुवात, म्हणाले-यूपी आता दंगल, माफियामुक्त

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दिवसात घेतल्या दोन सभा, २०२२ चा निवडणूक अजेंडा ठेवला समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उत्तर प्रदेशात दोन सभांना मार्गदर्शन करत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक करत शहा म्हणाले, मी २०१३ ते २०१९ दरम्यान उप्रच्या कानाकोपऱ्यात फिरलो. आधी येथे भरदिवसा गोळीबार व्हायचा. गुन्हे व गुन्हेगार अनियंत्रित होते. मात्र आज मी अभिमानाने सांगतो की, योगी आदित्यनाथ यांच्या टीमने राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. राज्याची अर्थव्यवस्था आज देशात दुसरी सर्वात मोठी आहे. केंद्राच्या ४४ मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य पुढे आहे. विरोधकांवर टीका करत सांगितले की, निवडणूक जवळ आल्यावर सक्रिय होणाऱ्या नेत्यांची सर्वाधिक संख्या उप्रत आहे. ते पूर आल्यावर, कोरोना काळात, शेतकरी उपाशी मरतात तेव्हा दिसत नाहीत.

लढाई भाजपशी की आमच्याशी हे बसप-काँग्रेसने ठरवावे : यादव
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी सांगितले, उत्तर प्रदेशची २०२२ ची निवडणूक देश वाचवायची आहे. निवडणूक राज्याची जनता आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात होणार आहे. अखिलेश म्हणाले, आघाडीसाठी त्यांच्या पक्षाचे दरवाजे सर्व लहान पक्षांसाठी उघडे आहेत. सर्व पक्ष भाजपला हरवण्यासाठी एकत्र यावेत म्हणून ते प्रयत्न करतील. बसप आणि काँग्रेसला ठरवायचे आहे की, त्यांची लढाई भाजपशी आहे की आमच्याशी, असेही अखिलेश म्हणाले.

विंध्याचल कॉरिडॉरचे केले भूमिपूजन
शहा यांनी लखनऊत पीजीआयला जात भाजप नेते कल्याणसिंह यांची चौकशी केली. सिंह यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. नंतर ते मिर्झापूरला गेले आणि अष्टपूजा डोंगरासाठी १६ कोटी खर्चाच्या रोपवेचे लोकार्पण केले. येथे त्यांनी आई विंध्यवासिनीचे दर्शन घेत विंध्याचल देवी कॉरिडॉरचे भूमिपूजन केले. तेथून ते वाराणसीला गेले व श्रीकाशी विश्वनाथांचे दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...