आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताजमहालाच्या तळघरातील 22 खोल्या उघडण्याची याचिका हाय कोर्टाने धूडकावून लावली आहे. पण, त्यानंतरही या सुंदर ऐतिहासिक इमारतीच्या मालकीचा नाव थांबण्याचे नाव घेत नाही. आता ताजमहालावर मालकी हक्क सांगणाऱ्या जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी खासदार दिया कुमारी यांना मुघल वंशज प्रिन्स तुसी यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी दिया यांचे सर्वच दावे सवंग प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा केला आहे.
राजकुमारी दिया यांनी ताजमहाल आपल्या पूर्वजांचा असल्याचा दावा केला आहे. त्यावर प्रिन्स तुसी म्हणाले -"त्यांनी एखादे दस्तावेज दाखवले तर मान्य. या केवळ हवेतील गप्पा आहेत. मुघल साम्राज्य, ब्रिटीश राजवट व त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. तुम्हाला एवढे दिवस ताजमहालाची आठवण झाली नाही. मुघल साम्राज्यात 14 ते 9 राजपूत राण्या होत्या. त्यामुळे तुम्ही आमच्या नातेवाईक आहात. तुमच्या रक्तात राजपुतांचा एक अंश असेल तर दस्तावेज दाखवा."
तुसी म्हणाले -"एका भाजप नेत्याने नुकतीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्या त्यांनी सर्वच गुरुद्वारे व चर्चची चौकशी करण्याची मागणी केली तर काय होईल. हे लोक सवंग प्रसिद्धीसाठी हिंदू-मुस्लिमांत वाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने अशा गोष्टींकडे लक्ष्य देऊ नये."
कोण आहेत प्रिन्स तुसी?
प्रिन्स तुसी हैदराबादचे रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण नाव प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी आहे. ते स्वतःला मुघल बादशहा शाहजहानचे वंशज मानतात. त्यांच्या मते, ते बहादुरशहा जफर यांच्या सहाव्या पीढीचे नेतृत्व करतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी अयोध्येतील बाबरी मशिद व ताजमहालावर दावा केला होता. पण, न्यायालयाने तो फेटाळून लावला. पूर्वी त्यांना आग्र्यात आल्यानंतर प्रोटोकॉल मिळत होता. पण, आता उर्स इंतजामिया कमिटी व पुरातत्व खाते हे दोघेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.
प्रिन्स यांच्या ताजमहाल दौऱ्यावेळी त्यांना सीआयएसएफचे सुरक्षा कवच मिळते. प्रिन्स तुसी यांनी सांगितले की, 4 वर्षापूर्वी त्यांनी हैदराबादेतील एका कोर्टात डीएनए चाचणीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांना मुघलांचे वंशज मानण्यात आले. तथापि, आता राजघराण्याची परंपरा कालबाह्य झाल्यामुळे आपल्याला मुघलांच्या संपत्तीची मालकी मिळणार नाही.
ताजमहालावर जयपूरच्या राजघराण्याचा दावा
दोन दिवसांपूर्वीच जयपूरच्या राजघराण्याने ताजमहालावर मालकीचा दावा केला होता. रॉयल फॅमिलीच्या सदस्या व भाजप खासदार दिया कुमारी म्हणाल्या होत्या -"त्या ठिकाणी आमचा राजवाडा होता. आता कुणीतरी ताजमहालाचे दरवाजे उघडण्याची मागणी केली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता वस्तुस्थिती उजेडात येईल. आमचेही या प्रकरणावर लक्ष्य आहे. आमच्याकडे दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यावरुन आमची ताजमहालावरील मालकी स्पष्ट होते. शाहजहानने आमच्या राजवाड्यावर ताबा मिळवला होता. तेव्हा देशात मुघलांची राजवट असल्यामुळे आम्हाला विरोध करता आला नाही."
भगवे वस्त्र व धर्मदंडासह प्रवेशावर वाद
अलाहाबाद हाय कोर्टात भगवे वस्त्र व धर्मदंडासह ताजमहालात प्रवेश देण्याप्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. जगद्गुरु परमहंस आचार्य धर्मेंद्र गोस्वामी यानी ही याचिका दाखल केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अयोध्या छावणी तपस्वी आखाड्याचे पीठाधीश जगद्गुरु परमहंसाचार्य यांना काही दिवसांपूर्वीच ताजमहालात प्रवेश नाकारण्यात आला होता. यासाठी त्यांच्या अंगावरील भगव्या वस्त्रांचा दाखला देण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनीही हाय कोर्टात एक याचिका दाखल केली आहे.
आतापर्यंत ताजमहालावर काय झाले?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.