आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेम अ‍ॅडिक्शन:घरच्यांनी ऑनलाईन अभ्यासासाठी मुलाला दिला मोबाईल, पोराने 'पब्जी' गेममध्ये चक्क 16 लाख रुपये उडवले

चंदीगड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाकडे तीन बँक अकाऊंटचा होता अ‍ॅक्सेस, स्वतःचा आणि मित्रांचा गेम अपग्रेड करायचा
  • यापूर्वीही 'पब्जी' गेमच्या अ‍ॅडिक्शनने अनेक घटना घडल्या आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अद्यापही काही ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे. या काळात शाळा-महाविद्यालये देखील बंद आहे. या दरम्यान अनेकजण या रिकाम्या वेळेत विरंगुळ्यासाठी 'पब्जी' गेम खेळत आहेत. दरम्यान या गेममुळे पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. घरच्यांनी  17 वर्षांच्या मुलाला ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला होता. मात्र या मुलाने आपल्या वडिलांचे तब्बल 16 लाख रुपये या गेमसाठी उडवले. या मुलाकडे तीन बँकेंच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस होता. 

मुलाने 'पब्जी' गेमसाठी चक्क 16 लाख रुपये उडवल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाकडे तीन बँकेच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस होता. याद्वारे तो स्वतःचा आणि मित्रांचा 'पब्जी' गेम मोबाईलमध्ये अपग्रेड करत होता. मुलाच्या कुटुंबियांना बँकेंच्या ट्रान्जेक्शनमधून ही माहिती समजली. मुलगा सर्व ट्रान्जेक्शन आपल्या आईच्या मोबाईलवरुन करायचा आणि बँक संबंधित सर्व मेसेज डिलिट करत होता, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. यापूर्वीही 'पब्जी' गेमच्या अ‍ॅडिक्शनने अनेक घटना घडल्या आहेत. बऱ्याचदा हा गेम बंद करावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser