आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
(अनूप मिश्रा)
भारतात 2 सप्टेंबर रोजी सर्वात प्रसिद्ध चिनी गेम पबजीसह 118 अॅप्स बंदी घालण्यात आली. तरीही याच्या व्यसनाला आहारी गेलेले लोक काही न काही खटाटोप करून ते डाउनलोड करण्याचा आणि खेळण्याचा प्रयत्न करतच आहेत. काही तर यासाठी हजारो रुपये सुद्धा उडवत आहेत. अनेक लोकांनी हॅकर्सच्या मदतीने गेम डाउनलोड करण्याची पद्धत अवलंबली. यासाठी ते प्रत्येकी 5-5 हजार रुपये खर्च करत आहेत.
विशेष म्हणजे हा गेम थेट चीनमधून डाउनलोड केला जात असल्याने हा एक चिंतेचा विषय आहे. चीनच्या अॅप स्टोअरवरून डाउनलोड केल्या जाणाऱ्या अॅपमुळे तुमच्या मोबाईलचा डेटा आणि खासगी माहिती धोक्यात आहे. ही माहिती चुकीच्या हातांमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, पेड गेमच्या माध्यमातून लोक पबजीच्या 'डेथ वॉरंट' अर्थात गेमच्या फायनल स्टेजपर्यंत सुद्धा पोहोचत आहेत. अर्थातच ही स्टेज प्ले स्टोअरच्या गेममध्ये उपलब्ध नाही. भारतात बंदी लागताच हॅकर्सची कमाई वाढली आहे. आता हॅकर्स सोशल मीडियार सर्रास याच्या जाहिराती करत आहेत.
अपडेट व्हर्जन सुद्धा डाउनलोड करून देत आहेत हॅकर
बंदीनंतर हा गेम प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाउनलोड होत नाही. तसेच एकदा डाउनलोड झालेला गेम अपडेट देखील होत नाही. त्यातही प्ले स्टोअरच्या गेममध्ये चार ते पाच स्टेज आहेत. पण, हॅकर आता पैसे घेऊन फायनल आणि एडव्हांस्ड स्टेज सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. सोबतच, डाउनलोडसह त्याचे अपडेट सुद्धा पुरवले जात आहेत.
सोशल मीडिया ग्रुप्स तयार करून माहिती
पबजी गेमर्स हा गेम साठवून ठेवण्याचे अनेक प्रयत्न करत आहेत. लोकांनी यासाठी नानाविध प्रकारचे ग्रुप सुद्धा तयार केले. यामध्ये ते आपल्यासारख्यांना मदत करत आहेत. ‘पबजी गेम के दीवाने’ या नावाने चालणाऱ्या एका ग्रुपमध्ये माहिती शेअर केली जात आहे. एखाद्याचा गेम चालत नसेल किंवा डिलीट झाला असेल तर तो या ग्रुपवरील सदस्यांना मदतही मागतो. गेम सेफ ठेवण्यासाठी लोक नवीन मोबाईल सुद्धा विकत घेत आहेत.
सायबर एक्सपर्टने दिला इशारा
सायबर एक्सपर्ट स्नेहल वकील यांनी सांगितल्याप्रमाणे, हॅकरच्या माध्यमातून एखादे गेम डाउनलोड करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे, देशाची सुरक्षा सुद्धा धोक्यात जाते. सोबतच, ज्यांनी अशा स्वरुपाचे गेम डाउनलोड केले असतील त्यांच्या मोबाईलची वैयक्तिक माहिती सुद्धा चुकीच्या हातांमध्ये जाते. तुमचे फोटोपासून तुमच्या वैयक्तिक माहितीसह अनेक बाबी देशाच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.