आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUBG हत्याकांड - 10 वर्षीय मुलीची 'आपबीती':खोलीत गेले तेव्हा आई तडफडत होती, मला तिला मिठी मारायची होती, पण भाऊ आला

लखनऊ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊच्या PUBG हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या 10 वर्षीय मुलीने अखेर तब्बल 12 दिवसांनी आपले मौन सोडले आहे. ती म्हणाली -"मी भावाला गोळी झाडताना पाहिले नाही. केवळ एक आवाज ऐकला. आई बेडवर झोपली होती. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. भाऊ माझे तोंड दुसऱ्या बाजूला करुन शेजारच्या खोलीत घेऊन गेला. काही वेळ मी तिथेच बसले. त्यानंतर पुन्हा आईच्या खोलीत आले. तिथे आई बेडवर तडफडत होती. मी जवळ गेले. तिला स्पर्श केला. तिला मिठीत घेणार होते, तेव्हाच भाऊ आला. मला काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी पुन्हा धावत शेजारच्या खोलीत गेले."

त्या रात्री घरात दुसरे कुणी उपस्थित होते का? या प्रश्नाला तिने नकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, "दुसऱ्या दिवशी सायंकाळी घरात दुर्गंध पसरला होती. मी भावाला म्हटले वास येतोय. त्यांनी संपूर्ण घरात रूम फ्रेशनर फवारला. दुसऱ्या दिवशी वास आणखी वाढला. तेव्हा भावाने शेजारच्या खड्ड्यात एखादा प्राणी मरुन पडल्याचे सांगितले."

मुलीने हत्येनंतरची आपबीती सांगितली...

सर्वकाही ठीक होईल...पप्पा येतील तेव्हा पाहू

4 जून रोजी रात्री साधना सिंह यांची हत्या झाली. घरात त्यांच्यासह केवळ त्यांचा 16 वर्षीय मुलगा व 10 वर्षीय मुलगी असते. मुलगी सांगते -"मी शेजारच्या बेडरूममध्ये होते. भावाने आईच्या खोलीची चाबी माझ्याजवळ ठेवली होती. त्या रात्री मी तिच्या खोलीत गेले, तेव्हा ती मी तिला शेवटचे पाहिले त्या अवस्थेत पाठीवर पडली होती. डोक्यातून निघणारे रक्त फरशीपर्यंत पसरले होते. तिचे हात व पाय वेगात हलत होते. मला खूप भीती वाटत होती."

भाऊ परत येताच मी केवळ "भाऊ आई" एवढेच म्हटले. त्यावर त्याने शांत राहण्याचा इशारा केला. म्हणाला -"थोड्याच दिवसांत सर्वकाही ठीक होईल. मी आहे. घाबरू नको. खोलीतून बाहेर जाऊ नको. मम्मीच्या खोलीचा दरवाजा उघडू नको. पप्पा येतील, तेव्हा पाहू. तोपर्यंत मी काहीतरी करतो."

मुलगी म्हणाली -"आई वारल्याचे माहिती नव्हते"

7 जूनपर्यंत त्या घरात राहिल्यानंतर बाहेर आलेली ही मुलगी आता आपल्या एका नातेवाईकाकडे राहत आहे. अनेकजण त्या रात्री नेमके काय घडले याची माहिती तिला विचारत आहेत. तिने मी भावाला गोळी चालवताना पाहिले नसल्याचे स्पष्टपणे सांगते. ती म्हणते - "एक आवाज ऐकल्यानंतर मी उठले. त्यानंतर भावाने मला आईकडे पाहू दिले नाही." त्यानंतर ती भावाने पोलिसांना सांगितले तेच सांगते. ती म्हणते -"आई वारली हे मला माहिती नव्हते."

भाऊ साधनाच्या श्वानाला (कुत्रा) घरात येऊ देत नव्हता

मुलगी सांगते -"त्या रात्री आईचा कुत्रा मॅक्स खूप जोरात भूंकत होता. भावाने त्याला लॉबीत बांधले. त्यानंतरही मॅक्सचे भूंकणे बंद झाले नाही. त्याचा आवाज वाढल्याने भावाने त्याला सोडले. तो आईच्या खोलीकडे जात होता. त्यावर भाऊ संतापाने पुन्हा त्याला बांधून टाकत होता."

बातम्या आणखी आहेत...