आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Coronavirus India Updates: Central Government Issues COVID 19 Lockdown Extension Guidelines

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राची नवीन गाईडलाईन:सार्वजनिक आणि काम करण्याच्या ठिकणी मास्क वापरने बंधनकारक, पब्लिक प्लेसवर थुंकल्यास दंड

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • लॉकडाऊनची नवीन गाईडलाईन जारी

केंद्र सरकारने बुधवारी लॉकडाऊनची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईननुसार सार्वजनिक आणि काम करण्याच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षा होईल आणि दंड भरवा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात 21 दिवसापासून चालू असलेला लॉकडाऊन आणखी 19 दिवस वाढवला आहे. दुसऱ्या लॉकडाऊनचे नियम अत्यंत कडक असतील, असा इशारा त्यांनी दिला होता.

1. या सुविधा 3 मे पर्यंत बंद राहतील 

 • सर्वप्रकाराच्या अंतर्गत आणि विदेशी विमानसेवा बंद राहतील.
 • सर्वप्रकारच्या प्रवासी ट्रेनही बंद राहतील.
 • पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या बस बंद राहतील.
 • मेट्रो रेल्वे सेवा बंद राहतील.
 • मेडिकल कारण सोडून इतर सर्व लोकांसाठी एका जिल्ह्यातून आणि राज्यातून दुसऱ्या ठिकणी प्रवास बंद राहील.
 • सर्वप्रकाराचे एज्युकेशन, ट्रेनिंग आणि कोचिंग इन्स्टिट्यूट्स बंद राहतील.
 • ज्यांना परवानगी मिळाले असेल त्यांना सोडून सर्वप्रकाराच्या कमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल गोष्टी बंद राहतील.
 • परवानगी नसलेल्या हॉस्पिटीलिटी सेवाही बंद राहतील.
 • ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब सेवाही बंद राहतील.
 • सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वामिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिअटर, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंद राहतील.
 • सर्वप्रकारचे सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बंद राहतील.
 • सामान्य लोकांसाठीही सर्वप्रकारचे धार्मिक स्थळ आणि इबादतचे स्थळ बंद राहतील

2. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनसाठी गाइडलाइन... 

 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाव्हायरस संक्रमण वाढविणारे क्षेत्र हॉटस्पॉट घोषित केले जावेत.
 • या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा प्रशासनानेही हॉटस्पॉट्स अंतर्गत कंटेनमेंट झोन जाहीर करावे.
 • कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही गतिविधीस परवानगी दिली जाणार नाही. कंटेनमेंट झोनच्या अंतर्गत येणाऱ्या भागांवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवले जाईल. वैद्यकीय आणि कायदा व सुव्यवस्था यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता लोक कंटेनमेंट झोनमध्ये आणि बाहेर जाऊ शकणार नाहीत. यासंबंधित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

3. निवडक कामांना 20 एप्रिलपासून परवानगी दिली जाईल... 

 • सर्वसामान्यांना होणा अडचणी लक्षात घेऊन 20 एप्रिलपासून काही निवडक कामांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करत या कामांना परवानगी देईल. परवानगी देण्यापूर्वी, ज्या कार्यालयांना प्रारंभ करण्यास सांगितले जात आहे त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग यासारखी तयारी आहेत की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असेल.

4. लॉकडाउन गाइडलाइंसची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल... 

 • राज्य सरकार आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे लॉकडाउनशी निगडित गाइडलाइंसमध्ये सूट देणार नाही.

5. सर्व प्रकारच्या रोग्या सेवा सुरु राहतील... 

 • रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडिसिन सेवा
 • डिस्पेंसरी, केमिस्ट, फार्मसी, जन औषधी केंद्रांसह सर्व प्रकारच्या औषधींची दुकाने आणि मेडिकल इक्विपमेंटची दुकाने
 • मेडिकल लॅब आणि कलेक्शन सेंटर
 • फार्मा आणि मेडिकल रिसर्च लॅब, कोरोनाशी निगडित रिसर्च करणाऱ्या संस्था
 • व्हेटर्नरी हॉस्पिटल, डिस्पेंसरी क्लिनिक, पॅथोलॉजी लॅब, लास आणि औषधांची विक्री
 • कोरोना रोखण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व अधिकृत खाजगी संस्था, होम केअर, डायग्नॉस्टिक आणि रुग्णालयांसाठी काम करणारी सप्लाय चेन
 • औषधी, फार्मा, मेडिकल डिवाइस, मेडिकल ऑक्सीजन, त्याच्याशी निगडित पॅकेजिंग मटेरियल आणि रॉ मटेरियल बनवणारे मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट्स
 • अँब्युलन्ससह मेडिकल, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती
 • सर्व प्रकारच्या मेडिकल, व्हेटर्नरी सेवांशी निगडित लोक, सायंटिस्ट, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, लॅब टेक्नीशियन, मिड वाइव्स आणि अँब्युलन्ससह रुग्णालयाशी निगडित सेवा करणाऱ्या लोकांचे राज्य आणि बाहेर मुव्हमेंट जारी राहील

6. शेतीशी संबंधित सर्व कामांना परवानगी दिली जाईल... 

 • शेतकरी व शेतात काम करणारे इतर.
 • एमएसपी ऑपरेशंससह शेतमाल खरेदी करणाऱ्या एजन्सीज
 • राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या मंडया

7. पब्लिक प्लेसबद्दल गाइडलाइन.... 

 • पब्लिक आणि वर्क प्लेसमध्ये मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. या सर्व जागांवर सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल
 • कोणत्याही संस्थेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचे एकत्र जमा होण्यावर बंदी आहे
 • लग्न किंवा अंत्यसंस्कारासारख्या ठिकाणी प्रशासनावाच्या निर्देशांचे पालन करावे लागेल
 • पब्लिक प्लेसवर थुंकल्यास शिक्षेबरोबरच दंडही भरावा लागेल
 • दारू, गुटखा, आणि तंबाखू या उत्पादनांच्या विक्रीवर प्रतिबंध राहील

8. वर्क प्लेसबद्दल गाइडलाइन... 

 • सर्व संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी लागेल
 • शिफ्ट बदलताना एका तासाचा गॅप देणे गरजेचे असेल. लंचदरम्यानही सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे केले जावे
 • घरात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती किंवा 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे लहान मुले असतील तर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जावे
 • खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतु ऍपचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे
 • सर्व संस्थांनी शिफ्ट संपल्यानंतर ऑफिस आणि परिसराला सॅनिटाइझ करावे
 • संस्था किंवा ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर मीटिंग केली जाऊ शकणार नाही.

30 एप्रिलऐवजी 3 मेपर्यंत लॉकडाउन का ?

अनेक राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवले होते. पंतप्रधानांनी देशभरात टोटल लॉकडाउन 30 एप्रिलच्या जागी आता 3 मेपर्यंत वाढवले आहे. सांगितले जात आहे की, त्यांनी असे यामुळे केले कारण, 1 मेला कामगार दिनाची सुट्टी आहे. महाराष्ट्र, जेथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे आहेत, तिथे 1 मेला महाराष्ट्र दिनाची सुट्टी असते. 2 मेला शनिवार आणि 3 मेला रविवार आहे. वीकेंडला लॉकडाउन उघडले असते तर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले असते. त्यामुळे 30 एप्रिलच्या जागी 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...