आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता : नितीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकार त्याबाबतची नियमावली तयार करत आहे

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल. सरकार याबाबतची नियमावली तयार करत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह प्रवास सुखकर होण्यासाठी हे नियम असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी संवाद साधला त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, वाहतूक आणि महामार्ग सुरू झाल्याने जनतेत विश्वास निर्माण होईल. बस आणि कार चालवताना हँडवॉश, सॅनिटायझिंग, फेस मास्क आदी सुरक्षित उपायांसह सामाजिक अंतराचेही पालन व्हावे. प्रवासी वाहतूक उद्योगासाठी बेलआऊट पॅकेजच्या मागणीवर गडकरी म्हणाले की, सरकार त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक आहे. अडचणी दूर करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. याबाबत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. कॉन्फेडरेशनच्या सदस्यांनी सार्वजनिक वाहतुकीबाबत या वेळी मागण्या मांडल्या.

बातम्या आणखी आहेत...