आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Puducherry Fire Crackers Explosion | Marathi News | Father And 7 Year Old Son Dead After Fire Crackers Explosion In Scooter

स्कूटर ब्लास्ट:स्कूटरवर 7 वर्षांच्या मुलासह फटाके घेऊन जात होते वडील, भर रस्त्यावर स्फोट; पिता-पुत्र दोघांचाही मृत्यू

चेन्नई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूत स्कूटरमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे भयंकर स्फोट घडला. या स्फोटात एका वडिलांसह त्यांच्या 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एक व्यक्ती आपल्या मुलासाठी फटाके खरेदी करून स्कूटरवर निघाली होती. त्या स्कूटरवर 7 वर्षांचा मुलगा देखील होता. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अरियानकुप्पम के कलैनेसन (37) असे त्या वडिलांचे नाव होते. तर 7 वर्षांच्या मुलाचे नाव प्रदीश असे होते. हे दोघे फटाके खरेदी करून पुद्दुचेरीकडे निघाले होते. त्याच दरम्यान पुद्दुचेरी-वेल्लुपुरम सीमेवर असलेल्या कोट्टाकुप्पम शहरात स्कूटरमध्ये अचानक स्फोट घडला. ही संपूर्ण घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

स्फोटानंतर 15 मीटर दूर फेकल्या गेले
पोलिसांनी या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये कलैनेसन स्कूटरवर जाताना दिसत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रदीश स्कूटरवरच फटाक्यांची बॅग पकडून बसला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोट्टाकुप्पम येथे घडलेला हा स्फोट इतका भयंकर होता की दोघे 15 मीटर दूर फेकल्या गेले. या दुर्घटनेत इतर तीन जण गणेश, सय्यद अहमद आणि व्हीजी आनंद हे देखील जखमी झाले आहेत. त्या तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन बॅगा भरून फटाके घेतले होते, गुन्हा दाखल
विल्लुपुरमचे पोलिस उप-महानिरीक्षक एम पांडियन आणि पोलिस अधीक्षक एन श्रीनाथ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर कलैनेसनने 3 नोव्हेंबर रोजी दोन बॅगा भरून देसी फटाके विकत घेतले होते अशी माहिती समोर आली. हेच फटाके घेऊन तो आपल्या सासरवाडीला निघाला होता. दिवाळीच्या दिवशी तो कूनीमेदु येथून एक बॅग घेऊन पुद्दुचेरीच्या दिशेने निघाला होता. त्याच दिवशी ही घटना घडली.

फटाक्यांमध्ये उष्णतेने स्फोट घडला असावा असे प्रथमदृष्ट्या दिसून येत आहे. पोलिसांनी परिसरातून एक पोते भर फटाके जप्त केले आहेत. तसेच याबाबत भारतीय दंड विधान आणि स्फोटांबाबतच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फटाक्यांवरून चेन्नईत 700 जणांविरुद्ध एफआयआर
याच दरम्यान, चेन्नईमध्ये पोलिसांनी फटाक्यांवरून 700 पेक्षा अधिक लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी फटाक्यांबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. कोर्टाने सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत फटाक्यांची वेळ निश्चित केली होती. तत्पूर्वी स्फोटकांचे नियम भंग केल्याप्रकरणी 239 दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...