आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान सरकारची आश्वासनपूर्तता नाही:पुलवामा शहिदांच्या पत्नींचे धरणे, इच्छामृत्यूची मागितली परवानगी

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पुलवामा  हल्ल्यातील छायाचित्र - Divya Marathi
पुलवामा हल्ल्यातील छायाचित्र

पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील तीन शहिदांच्या पत्नींनी राजस्थान सरकारकडे आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे इच्छामृत्यूला परवानगी देण्याची मागणी केली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीमल मीना म्हणाले, राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे इच्छामरणासाठी अर्ज केला आहे. महिलांसोबत मीनाही गेल्या काही दिवसांपासून आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करत होते. राज्यपालांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जाताना पोलिसांनी त्यांना रोखले. मीना यांच्या आरोपानुसार, पोलिसांनी महिलांना धक्का दिला,त्यामुळे दिवंगत रोहिताश्व लांबा यांची पत्नी मंजू जाट जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. भाजप खासदार म्हणाले की, शहिदांच्या कुटुंबांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी सरकार दडपशाही करत आहे. पोलिस छळ करत आहे.

बातम्या आणखी आहेत...