आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pulwama Terror Attack Accused Jaish E Mohammed Chief Masood Azhar Charge Sheeted As Mastermind

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुलवामा हल्ल्यात चार्जशीट दाखल:एनआयएने जैशचा म्होरक्या मसूद अजहरसह 19 जणांना आरोपी घोषित केले, यात ठार झालेल्या 7 दहशतवाद्यांचे नाव सामील

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुलवामामध्ये मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या एक तुकडीवर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते

नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (एनआयए) ने मंगळवारी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. एनआयएने 13,500 पानांच्या चार्जशीटमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चीफ मसूद अजहरसह 19 जणांना आरोपी बनवले आहे.

चार्जशीटमध्ये मसूदचा नातलग अम्मर अल्वी आणि अब्दुल रऊफ असगरशिवाय ठार झालेला दहशतवादी मोहम्मद उमर फारूख, सुसाइड बॉम्बर आदिल अहमद डारसह इतर पाकिस्तानातून ऑपरेट करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

महत्त्वपूर्ण पुराव्यांसह मजबुत झाले प्रकरण

एनआयए अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, चार्जशीटमध्ये सर्व आरोपींविरोधात ठोस पुराव्यांसह मजबूत केस बनला आहे. यात त्यांची चॅट, कॉल डिटेल्स इत्यादी सामील आहेत, जे 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका दर्शवतात.

जुलैमध्ये मोहम्मद इकबाल राथेडला अटक केली होती

एजेंसीने जुलैमध्ये जम्मू-काश्मीरच्या बडगामचा रहिवासी असलेल्या 25 वर्षीय मोहम्मद इकबाल राथेडला अटक केली होती. त्याच्यावर घुसखोरी करणे, जेईएम दहशतवादी आणि हल्ल्याचा मास्टरमाइंड मुहम्मद उमर फारूकला जम्मूमध्ये आणण्यात मदत करण्याचे आरोप आहेत.