आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे निर्बंध लागू होणार:राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती; मुंबईपाठोपाठ पुण्यातही नववीपर्यंतच्या शाळा बंद

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईनंतर आता पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

मुंबईपाठोपाठ पुण्यातही नववीपर्यंतच्या शाळा बंद, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्विटवरुन माहिती, म्हणाले -

1 ली ते 9 वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ! आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल.

राज्यात कोरोनाचा नवा प्रकार प्रकार ओमायक्रॉन संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईनंतर आता पुणे शहरांतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.

महाविद्यालये सुरू ठेवायची की ऑनलाईन? उद्या निर्णय- सामंत
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...