आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे रेल्वे स्थानकातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ट्रेन पकडण्याच्या प्रयत्न करित असलेली एक महिला दरवाज्यातून खाली पडली आणि ट्रेन आणि पलाटाच्या मध्येच अडकली. त्यातच तिच्या मुलीने जोरात आरडाओरड सुरू केल्याने रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन त्या महिलेचा जीव वाचवला. या घटनेनंतर महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना गेल्या रविवारची (1 जानेवारी) आहे. संपूर्ण घटना स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ज्या ट्रेनमध्ये महिलेला चढायचे होते, ती गाडी पुढे गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. ही महिला मुंबईकडे जाणारी प्रगती एक्स्प्रेसला धावत पकडण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. पण प्रसंगावधान राखले गेल्याने तिचा जीव वाचवला गेला.
मुलीच्या आरडाओरड ऐकूण जवान धावला
महिलेसोबत तिची मुलगीही होती. ती कशीबशी तिच्या मुलीला ट्रेनमध्ये बसवते, पण ती स्वतः चढायला जात असताना तिचा पाय घसरला. महिला पडताच मुलगी जोरात ओरडते. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक ओट्यावर आले. त्यानंतर एक आरपीएफ जवान विनोद मीणा या महिलेकडे धावतो. तिला बाहेर काढतो. हे सर्व पाहून लोकल पायलट लगेच ट्रे थांबवतो. सद्या या थरकाप उडविणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी देखील त्या आरपीएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत. त्याचवेळी महिलेच्या या कृत्याबद्दल लोकांनी आश्चर्यही व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.