आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये अपघात:होशियारपूरमध्ये एअरफोर्सचे मिग -29 लढाऊ विमानाचा अपघात, पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी

चंडीगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लढाऊ विमानाने जालंधरमधील आदमपूर एअरबेस वरून प्रशिक्षणासाठी केले होते उड्डाण
  • तांत्रिक बिघाडामुळे पायलटला विमान नियंत्रित करता आले नाही

पंजाबच्या होशियारपुरमध्ये शुक्रवारी हवाईदलाचे मिग-29 लढाऊ विमान क्रॅश झाले. पायलट सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला. हेलिकॉप्टरद्वारे त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे. 

हवाई दलाचे प्रवक्ता विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी सांगितले की, 8 मे रोजी सकाळी 10:45 वाजता एक मिग-29 विमानाचे प्रशिक्षण सुरू होते. तेवढ्यात जालंधर हवाईतळावर अपघात घडला. विमानात तांत्रिक बिघाड आला होता. यामुळे पायलटला विमानावर नियंत्रण मिळवता आले नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

आदमपूर हवाईतळावरून घेतले होते उड्डाण 

नवंशहरला लागून असलेल्या होशियारपूर जिल्ह्यातील रुड़की कलां गावच्या शेतात मिग-29 चा अपघात झाला. प्रशिक्षणासाठी सैनिकांनी जालंधरच्या आदमपूर एअरबेसवरुन उड्डाण केले होते. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावरील नियंत्रट सुटताच पायलटने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली. काही वेळाने विमान जमिनीवर पडले आणि त्याला आग लागली.

बातम्या आणखी आहेत...