आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Assembly Election 2022 | Punjab News | Punjab Congress First List | Marathi News | Punjab Congress Announces List Of First 86 Candidates; Navjot Singh Sidhu From Amritsar East And Malvika Sood From Moga

मिशन पंजाब:पंजाब काँग्रेसची पहिली 86 उमेदवारांची यादी जाहीर; नवजोतसिंह सिद्धू अमृतसर पुर्वेतून, तर मालविका सूद मोगातून निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब विधानसभेचे बिगुल वाजले असून, काँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभेची आपली पहिली यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे चमकौर साहिब आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू हे अमृतसर ईस्ट येथून निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर अभिनेते सोनू सुद यांची बहिण मालविका सूदला मोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आले आहे.

काँग्रेस पंजाब विधानसभेसाठी कंबर कसली असून, आज आपली पहिली 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे चमको साहिब या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर नवजोत सिंह सिंद्धू यांनी अमृतसर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेते सोनू सुद यांनी बहिण मालविका हिला मोगा येथील उमेदवारी देण्यात आली. तर गायक सिंद्धू मूसेवाला यांना मानसा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर तर कादियातून प्रताप सिंह बाजवा, पठानकोटमधून अमित विज आणि दीनानगर येथून अरुणा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बलबीर सिंद्धू हे मोहाली येथून मैदानात उतरणार आहेत. तर कॅप्टन अमरिंदर सिंहचे जवळचे नातेवाईक असलेले कॅप्टन संदीप संधू यांना देखील काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. तर मलोटचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष अजब सिंह भट्टी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये येणाऱ्या रुपिंदर कौर रुबी यांनी तिकीट देण्यात आले आहे.

तत्पूर्वी, दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तिकिटांची पहिली यादी अंतिम करण्यासाठी विचारमंथन सुरू होते. मात्र तरीही पाच नावांवर एकमत होऊ शकले नाही. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत विचारमंथन झाले. पंजाबमधील सर्व दिग्गज नेत्यांनी आपली बाजू सोनिया गांधींसमोर मांडली आहे. सुमारे 20 जागांवर आपल्या समर्थकांचे समायोजन करण्याच्या प्रकरणात सिद्धू आणि चन्नी विरोध करत असल्याची बाब समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...