आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bathinda Military Station Firing VIDEO; Firing Inside Bathinda | 4 Deaths | Punjab

हल्ला:भटिंडा लष्करी छावणीत गोळीबार, 4 ठार; संशयित ताब्यात, आपसात गोळीबाराची भीती, गायब झालेली गन वापरल्याचा संशय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील लष्करी छावणीत बुधवारी पहाटे गोळीबार झाला. भटिंडा येथे झालेल्या या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. ठार झालेल्यांमध्ये सैनिक आहेत की नागरिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराने सांगितले की, सकाळी 4:35 वाजता अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये गोळीबार झाला. लष्करी छावणीत सर्च ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. लष्कराने अद्याप याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही.

एका संशयिताला अटक, कसून चौकशी

याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याआधी पंजाब पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला नसल्याचे सांगितले होते. जवानांमधील आपसात गोळीबाराचे हे प्रकरण आहे. आम्ही सर्व पैलूंची चौकशी करू, असे लष्कराने सांगितले. त्यात 2 दिवसांपूर्वी युनिटच्या गार्ड रूममधून हरवलेल्या INSAS रायफल आणि गोळ्यांचाही समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेत या रायफलचा वापर केला जाण्याची शक्यता पोलिस आणि लष्कराला आहे. गोळीबारानंतर लष्कर छावणी सील करण्यता आली असून लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.

गोळीबार घटनेच्या संदर्भात अपडे्टस

  • लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यासंदर्भात माहिती देणार आहेत.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत लष्कराकडून अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारने भटिंडा पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे.
  • लष्करी छावणीत सैनिकांची कुटुंबे राहतात. या घटनेनंतर लष्कराने सर्वांना आपापल्या घरात राहण्यास सांगितले आहे. कॅन्टोन्मेंटमधील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

आशियातील सर्वात मोठी छावणी अशी ओळख
भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे. या मिलिटरी छावणीची हद्द सुमारे 45 किलोमीटर आहे. येथील दारूगोळा डेपो हा देशातील सर्वात मोठ्या डेपोपैकी एक असल्याचे सांगितले जाते.

कॅन्टोन्मेंटमध्ये इन-आऊटवर निर्बंध
कॅन्टोन्मेंटमध्ये लोकांना प्रवेश आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाब पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही कॅन्टमध्ये पोहोचले आहेत. भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे.

गोळीबार बाबत केले जात आहे 4 दावे

1. दहशतवादी हल्ला
पोलिसांना लष्करी ठाण्याच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी भास्करला सांगितले. कॅन्टच्या बाहेरून गोळीबार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले जात आहे.

2. जवानांमध्येच गोळीबार
काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, मिलिटरी स्टेशनच्या ऑफिसर्स मेसमध्ये गोळीबार झाला आणि गोळीबार करणारी व्यक्ती साध्या वेशात होती. भटिंडाच्या SSP यांनी हा हल्ला दहशतवादी नाही, हे सैनिकांमध्येच गोळीबार झाली असावी असे त्यांचे म्हणणे आहे.

3. सर्च ऑपरेशन दरम्यान संशयिताने केला गोळीबार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे भटिंडा लष्करी छावणीत संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान संशयिताने जवानांवर गोळीबार केला. शूटर साध्या वेशात होता.

4. दोन दिवसांपूर्वी रायफल झाली होती बेपत्ता
पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एक रायफल आणि 28 गोळ्या बेपत्ता झाल्या होत्या. या घटनेमागे लष्करातील कोणीतरी असू शकते, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पंजाबमध्ये लष्कराच्या तळावर झाला होता हल्ला
जानेवारी 2016 मध्ये जैश-ए-मोहम्मदने पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला केला होता. त्याचे 6 दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसले. ते शस्त्रे घेऊन एअरबेसमध्ये घुसले होते. जिथे अंदाधुंद गोळीबारात 7 जवान शहीद झाले होते. तर अतिरेकीही मारले गेले होते. तसेच जुलै 2015 मध्ये गुरुदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये लष्कराचा गणवेश परिधान करून दहशतवादी दीनानगर पोलिस ठाण्यात घुसले. हे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे होते. त्यांना ठार करण्यात आले.

हल्ल्यासंदर्भात अन्य बातम्या देखील वाचा

जम्मू काश्मिरात एका तासात 2 हल्ले:अतिरेक्यांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी ग्रेनेड फेकले; एका पोलिसासह 2 जखमी

जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी सायंकाळी एका तासात अतिरेक्यांनी 2 ग्रेनेड हल्ले केले. पहिला हल्ला बडगामच्या गोपाळपोरा चडूरा भागात झाला. त्यात करण कुमार सिंह नामक व्यक्ती जखमी झाला. त्याला उपचारासाठी श्रीनगर स्थित एका रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

रशिया-युक्रेन युद्ध:रशियाचा युक्रेनच्या लष्करी तळावर हल्ला; अमेरिकेला दिला इशारा, म्हणाला -युक्रेनचा शस्त्र पुरवठा बंद करा

रशिया-युक्रेन युद्धाला 52 दिवस झालेत. रशियाने शनिवारी कीव्ह स्थित युक्रेनच्या लष्करी कारखान्यावर हल्ला केला. त्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले. या युद्धात आतापर्यंत दोन्ही देशांचे शेकडो जवान शहीद झालेत. तसेच लहान मुलांसह नागरिकांचाही बळी गेला आहे. कीव्ह पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत राजधानीत 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह आढळलेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी

म्यानमार लष्कराने जमावावर केली बॉम्बफेक, 100 जणांचा मृत्यू; 20 मिनिटे हवेत गोळीबार

म्यानमारच्या लष्कराने मंगळवारी 20 मिनिटे सतत विमानातून बॉम्बफेक आणि गोळीबार केला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डझनभर महिला आणि लहान मुलांचा सहभाग आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी