आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून काढल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग मंगळवारी संध्याकाळी दिल्लीला पोहोचत आहेत. दरम्यान, येथे कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊ शकतात. कॅप्टनच्या या वृत्तानंतर पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्ष आणि राजकीय विश्लेषकांपासून ते काँग्रेसवाल्यांपर्यंत कॅप्टनच्या भूमिकेची वाट पाहत होते. नवजोत सिद्धू यांच्याशी झालेल्या भांडणानंतर अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पंजाब राज्याचे सूत्र काँग्रेस हायकमांडने चरणजित चन्नी यांच्याकडे सोपवले आहे.
राजीनाम्यानंतर भाजपला सांगितला होता पर्याय
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पदाचा राजीनामा देताना भाजपमध्ये सामील न होण्याबाबत कोणतेही स्पटीकरण दिले नव्हते. आपल्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असे ते म्हणाले होते. दुसऱ्या पक्षात जाताना आपल्या समर्थकांशी सल्लामसलत केल्यावरच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री असताना ते अमित शहा यांची भेट घ्यायचे. परंतु, आता राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत आहेत, यावरुन ते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅप्टनने आधीच तयार केले होते मन
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्ष 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस हायकमांडशी वाद घातला होता. तेव्हा प्रतापसिंह बाजवा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिली जाट महासभा स्थापन करून काँग्रेसला आव्हान दिले. मात्र, नंतर त्यांना प्रदेश काँग्रेसची कमान सोपवण्यात आली. त्यावेळी आपण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, असे ते म्हणाले होते.
सामील होतील की नवीन पक्ष तयार करतील?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत ते भाजपमध्ये सामील होतील की नवीन पक्ष तयार करतील असा प्रश्न आहे. कारण, कॅप्टनने पंजाबमध्ये जाट महासभा स्थापन केली होती. मात्र, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ही संघटना मागे पडली होती. परंतु, आता या संघटनेच्या माध्यमातून ते आपली ताकद वाढवू शकता अशी चर्चा सुरु आहे. यानंतर थेट भाजपमध्ये किंवा पंजाबच्या राजकारणात युतीच्या राजकारणाद्वारे फुटू पाडू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.