आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Punjab Chief Minister Amarinder Singh's Protest Against Central Government On Jantar Mantar, Accuses Punjab Of Discriminating

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विधेयकाला विरोध:पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांचे जंतर-मंतरवर केंद्रविरोधी धरणे, पंजाबला भेदभावाच्या वागणुकीचा आरोप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे 40 दिवसांत रेल्वेला 1200 कोटींचा फटका, मालवाहतूकही थांबली

पंजाब व केंद्र सरकारदरम्यान कृषी कायदा व विजेच्या मुद्द्यावर संघर्ष वाढत चालल्याचे दिसून येते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी बुधवारी जंतर-मंतरवर धरणे धरले. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी सातत्याने विरोध करत आहेत. केंद्र सरकारने पंजाबमध्ये रेल्वेसेवा स्थगित केली आहे. अमरिंदरसिंह यांनी काँग्रेस आमदार व पक्षाच्या इतर नेत्यांसह दिल्लीत जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले. येथे काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठकही घेतली. या आंदोलनात काँग्रेस नेते नवज्योतसिंहांसह काँग्रेसचे आमदार व खासदार यांच्यासमवेत लोक इन्साफ पार्टीचे आमदार सिमरनजितसिंह बैंस, पंजाबी एकता पार्टीचे आमदार सुखपाल खैरा, शिराेमणी अकाली दलाचे आमदार परमिंदरसिंह ढिंडसा सहभागी झाले होते. तत्पूर्वी अमरिंदरसिंह यांना महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी राजघाटावर आंदोलन करण्याची इच्छा होती. परंतु पोलिसांनी परवानगी दिली नाही. केंद्र सरकार राज्याला जीएसटीचा वाटा देत नाही. त्याशिवाय दररोज तीन ते चार तासांपर्यंत वीज कपात केली जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. खताचा तुटवडा आहे. याप्रसंगी सिद्धू म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर माझे अमरिंदर यांना समर्थन आहे.

आंदोलनामुळे ४० दिवसांत रेल्वेला १२०० कोटींचा फटका, मालवाहतूकही थांबली

आंदोलक शेतकरी रेल्वे परिसर, प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅकसह ३२ ठिकाणी ठिय्या करत आहेत. पंजाबमध्ये २५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांचे रेले रोको सुरू होते. त्यामुळे आतापर्यंत २ हजार २२५ मालगाड्या ठप्प आहेत. सुमारे १ हजार ३५० प्रवाशांनी प्रवास रद्द किंवा मार्ग बदलला. त्यामुळे रेल्वेचे १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे रुळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठी पंजाब सरकारला पत्रही पाठवले होते. सेवेत अडथळा आल्याने पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचलमधील मालवाहतुकही थांबली आहे.

राज्य सरकारने तोडगा काढावा : जावडेकर

तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र निदर्शनांमुळे ३२ ठिकाणी रेल्वे ठप्प आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, हा प्रश्न राज्य सरकारने सोडवला पाहिजे, तरच रेल्वेसेवा सुरू होईल. विजेच्या मुद्द्यावर जावडेकर म्हणाले, पंजाबला आवश्यक वीज केंद्र राज्याला देत आहे.