आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सेक्टर-2 स्थित कोठीहून अवघ्या काही अंतरावरील राजिंदरा पार्कमध्ये एक जिवंत बॉम्ब आढलला आहे. बॉम्ब आढळलेल्या जागेपासूनच काही अंतरावर हेलिपॅड आहे. तिथे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होते. त्यामुळे या भागात बॉम्ब आढळल्याची माहिती मिळताच एकच खळबळ माजली.
चंदीगड पोलिसांच्या टीम्स, बॉम्बनाशक पथक व श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बच्या चौफेर सुरक्षा कडे निर्माण करण्यात आले आहे. चंडी मंदिर स्थित लष्करालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आर्मीचे बॉम्ब डिस्पोजल पथकही येथे लवकरच पोहोचणार आहे.
100 क्रमांकावर पोलिसांना दिली माहिती
यासंबंधीच्या माहितीनुसार, राजिंदरा पार्कमधील आंब्याच्या बागेत हे बॉम्ब शेल पडले होते. हे क्षेत्र UT च्या अधिकार क्षेत्रात येते. दुपारच्या वेळी येथे एक वाटसरू गेला होता. त्याला बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्यानंतर त्याने लगेचच 100 क्रमांकावर पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथकासह क्षेत्राचे डीएसपीही घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे, चंदीगड प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकानेही घटनास्थळी धाव घेतली आहे.
चारही दिशांना वाळूच्या बॅग्स ठेवल्या
दुसरीकडे, स्थितीचा निपटारा करण्यासाठी सेक्टर-11 फायर स्टेशनचे इन्चार्ज अमरजित सिंगही पोहोचलेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, हा बॉम्ब जिवंत होता. तो अत्यंत सावधपणे फायबरच्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आहे. त्याच्या चारही बाजूंना वाळूच्या बॅग ठेवण्यात आल्यात. चंडी मंदिर आर्मीला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच लष्कराच्या काही जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
संपूर्ण परिसर सील
बॉम्बची माहिती मिळताच उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी लष्कराची वाट पाहिली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.