आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab CM On Modi | There Was No Attack On PM Modi Convoy Clears Punjab CM After Firozpur Incident

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, शांततापूर्वक आंदोलकांना गोळ्या घालणार नाही -चरणजीत सिंग चन्नी

चंदीगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवल्यानंतर त्यांना फिरोजपूर येथील सभा रद्द करावी लागली. भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून पंजाब सरकार आणि काँग्रेसला धारेवर धरले. पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे अडवल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. त्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पीएम मोदींवर हल्ला झालेला नाही
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे सांगितले जात आहे. परंतु, पीएम मोदींवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. यामध्ये विनाकारण राजकारण केले जात आहे असे चन्नी म्हणाले.

शांततापूर्वक आंदोलकांवर गोळीबार करता येणार नाही

कित्येक दिवसांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु, अजुनही त्यांच्या काही मागण्या बाकी आहेत. त्यासाठीच शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये शांततापूर्वक आंदोलन केले आहे. शांततापूर्वक आंदोलकांवर कुणी गोळीबार करू शकत नाही असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यात पंतप्रधानांची सुरक्षा भेदली जाईल किंवा त्यांचा अपमान होईल असे काहीही झालेले नाही.

मुळात पंतप्रधान रस्त्याने जाणार आहेत हा कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता. तो अचानक ठरवण्यात आला. पंतप्रधानांना परत जावे लागले याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मी पंजाबच्या लोकांवर लाठीमार किंवा गोळीबार करणार नाही. यासंदर्भात कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. तरीही पंतप्रधानांना त्यांची सुरक्षा भेदली गेली असे वाटत असेल तर त्याची चौकशी केली जाईल असेही चन्नी यांनी सांगितले.

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद म्हणाल -मोदी

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरोजपूर येथील सभा रद्द करण्यात आली. पंतप्रधानांचा ताफ्यासमोर शेतकरी आले असताना त्यांचा ताफा 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आला. यानंतर विमानतळावर पोहोचलेल्या मोदींनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परत गेल्यानंतर बठिंडा विमानतळावर पोहोचले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, मोदींनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "मी विमानतळापर्यंत जिवंत पोहोचलो. आपल्या मुख्यमंत्र्यांना जाऊन माझा धन्यवाद म्हणाल!"

बातम्या आणखी आहेत...