आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Congress Crisis Updates; Navjot Singh Sidhu Charanjeet Singh Channi | Punjab Cabinet Meeting Today Latest News

पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद:मुख्यमंत्री चन्नींनी बोलावली तातडीची बैठक; कपिल सिब्बल यांचा हायकमांडवर निशाणा, केजरीवाल यांच्याकडून सिद्धूंची बाजू, म्हणाले...

जालंधर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा आणि मंत्री तृप्त राजिंदर बाजवा यांचा समावेश आहे. दोघेही तेच नेते आहेत ज्यांनी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजवटीचे नेतृत्व केले. कॅप्टन यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सिद्धूंना प्रमुख बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, उपमुख्यमंत्री ओपी सोनी आणि मंत्री भारतभूषण आशु यांच्यासह मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

असे मानले जाते की या बैठकीत पंजाबमध्ये निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि महाधिवक्ता (एजी) यांच्या नियुक्तीवर, सरकारकडून नवज्योत सिद्धूंना काय उत्तर द्यावे?, याविषयी चर्चा देखील होईल. तत्पूर्वी, मुख्यमंत्री चन्नी यांनी सिद्धूंना भेटण्याचा आणि बसून बोलण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्या आक्षेपाची त्यांच्याशी चर्चा करा, त्यानंतर त्यांच्यावर निर्णय घेतला जाईल.

सिद्धूंच्या राजीनाम्याने कपिल सिब्बल यांचा हायकमांडवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्याच्या बहाण्याने पुन्हा एकदा हायकमांडवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पक्षाचे निर्णय कोण घेत आहे, आम्हाला माहिती नाही. आम्ही कोणाचाही विरोधात नाही, पण पक्षाच्या बाजूने आहोत. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. आमच्या पक्षाचा एकही अध्यक्ष नाही. अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही लिहिले होते.

सिब्बल म्हणाले की, लोक पक्ष सोडत आहेत, ते का सोडत आहेत, यावर आपण विचार केला पाहिजे. पंजाबबाबत, बैठकीत चर्चा व्हायला हवी, कारण शेजारील देश आणि ISI या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊ शकतात.

केजरीवाल सिद्धूंच्या बाजूने, म्हणाले...

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवज्योत सिद्धू यांची बाजू घेताना दिसले. ते म्हणाले की, कलंकित मंत्री आणि अधिकाऱ्यांना काढून टाकले पाहिजे. नवीन मुख्यमंत्र्यांना संदेश देताना केजरीवाल म्हणाले की, बरगाडी घटनेच्या अहवालावर त्यांना 24 तासात अटक होऊ शकते. यासोबतच सरकारने बेरोजगारी भत्ता आणि तरुणांना नोकऱ्या द्याव्यात आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.

चंदीगड विमानतळावर दाखल झालेले केजरीवाल म्हणाले की, फक्त आम आदमी पार्टीच पंजाबला स्थिर, प्रामाणिक सरकार देऊ शकते. चार महिन्यांनी निवडणुका होत आहेत, त्यांचा पक्ष असा मुख्यमंत्री चेहरा देईल ज्याचा सर्वांना अभिमान वाटेल.

सीएम चन्नी म्हणाले - सिद्धू पक्षाचे प्रमुख आहेत, काही आक्षेप असतील तर एकत्र सोडवू
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी नवजोत सिंग सिद्धू यांना इशाऱ्यात उत्तर दिले. ते पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले की, पक्षप्रमुख हे कुटुंबप्रमुख असतात. प्रमुखाने कुटुंबात आपला मुद्दा ठामपणे ठेवला पाहिजे आणि तो पुढे नेला पाहिजे. त्यांना काही आक्षेप असेल तर या आणि बोला. त्यांचे सरकार सतत काम करत आहे, जे काही प्रश्न असतील ते एकत्र सोडवले जातील.

मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, आजही त्यांनी नवज्योत सिद्धूंशी बोलले आहे की पक्ष सर्वोच्च आहे. सरकार पक्षाची विचारधारा स्वीकारते आणि त्याचे पालन करत आहे. ज्या बाबींवर त्यांना आक्षेप आहे त्या विषयांवर पूर्वी चर्चा होऊ शकली असती आणि आता ते करू शकतात. परगटसिंगसह अनेक मंत्री त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलू आणि जे काही समस्या असतील ते सोडवतील. पंजाबमधील लोकांचे प्रश्न सोडवण्यास ते मागेपुढे पाहणार नाही. वेळ मिळेल तसा सिद्धूंबरोबर बसून बोलू. मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, कोणत्याही पदावर कोणत्याही अधिकारी-नेत्याची नियुक्ती करण्याच्या बाबतीत त्यांना कोणताही अहंकार नाही, परंतु चुकीच्या गोष्टींविरोधात बोलू. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत विश्वासघात किंवा बेईमानी होणार नाही.

हायकमांडने कोणालाही राजी करायला पाठवले नाही
तत्पूर्वी, काँग्रेस हायकमांड नवज्योत सिद्धू यांच्या अचानक राजीनाम्यावर नाराज असल्याचे दिसते. त्यांचे मन वळवण्यासाठी कोणताही नेता दिल्लीहून पाठवला गेला नाही. ही जबाबदारी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडे सोपवण्यात आली. आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिद्धूंवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. खासदार मनीष तिवारी यांच्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री डॉ.अश्विनी कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सिद्धू यांचा राजीनामा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तथापि, ते म्हणाले की आता आपण परिस्थिती सुधारण्यात वेळ वाया घालवू शकत नाही. आपण ताबडतोब पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी (PPCC) चे नवीन अध्यक्ष नेमले पाहिजे. हा सल्ला अशा वेळी आला आहे जेव्हा सिद्धूंचा राजीनामा अद्याप काँग्रेस हायकमांडने स्वीकारलेला नाही.

दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री परगट सिंह आणि अमरिंदर सिंग राजा वडिंग यांची एक समिती स्थापन केली आहे. हे दोन्ही मंत्री सिद्धूंचे जवळचे आहेत. ही समिती सिद्धू यांच्याशी त्यांच्या नाराजीबद्दल आणि ती कशी सोडवायची याबद्दल बोलणार आहे. यापूर्वीही हे दोन्ही नेते सिद्धूंना दोनदा भेटले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने असेही म्हटले आहे की, सिद्धू सहमत नसल्यास नवीन प्रमुख निवडला जावा.

सध्या मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांची कॅबिनेट बैठक चंदीगडमध्ये सुरू आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यामध्ये ते सिद्धू आणि त्यांच्या राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊ शकतात. या व्यतिरिक्त, हायकमांडने दिलेल्या 18-कलमी सूत्राशी संबंधित मोठे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात. यामुळे सिद्धू, जे थेट आरोप करत आहे की हा प्रश्न सोडवला जात नाही, त्याला उत्तर दिले जाईल.

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ मंत्रीपद सोडणाऱ्या रझिया सुल्ताना बुधवारी पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी मंत्रिमंडळ पदाचा राजीनामा मंगळवारी संध्याकाळीच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे पाठवला होता. याशिवाय, नवज्योत सिद्धूचे सर्वात जवळचे असलेले परगट सिंह जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

सिद्धूंच्या समर्थनार्थ 3 राजीनामे
सिद्धू यांनी मंगळवारी दुपारी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काही वेळातच कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांनीही राजीनामा दिला. यानंतर सिद्धू यांचे रणनीतिक सल्लागार, माजी डीजीपी मुहम्मद मुस्तफा यांच्या पत्नी आणि कॅबिनेट मंत्री रझिया सुल्ताना यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. थोड्या वेळाने सरचिटणीस योगेंद्र धिंग्रा यांनीही राजीनामा दिला. यानंतर परगट सिंग यांच्या राजीनाम्याची अफवा पसरली, पण त्यांनी ती फेटाळून लावली.

बातम्या आणखी आहेत...