आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनचा उडाला फज्जा:पंजाबमध्ये कर्फ्यू पास दाखवण्यावरून निहंग्यांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला, पोलिस अधिकाऱ्याचा हात कापला

पंजाब3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळामध्ये निहंग्यांनी  पोलिसांवर हल्ला केला. यामुळे तेथे एकच गदारोळ उडाला - Divya Marathi
पतियाळामध्ये निहंग्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामुळे तेथे एकच गदारोळ उडाला
  • रविवार सकाळी 6 वाजता घडली घटना, पोलिस स्टेशन प्रभारी बिक्कर सिंग आणि एक कर्मचारी जखमी
  • घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 आरोपी अटकेत

पतियाळाच्या भाजीमंडईत आज सकाळी निहंग्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा हात कापला गेला. तर इतर दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पीजीआय चंढीगडला रेफर केले. तर जखमींना पतियाळातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर निहंग गुरुद्वारा खिचडी साहेबमध्ये लपेल होते. कमांडो टीमने गुरुद्वारातून 7 आरोपींना अटक केली आहे. 

एसएसपी मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले की, एका गाडीतून  5 निहंग सिंह भाजी मंडईत गेले होते. येथे पोलिसांनी त्यांना अडवून कर्फ्यू पासबाबत विचारणा केली होती. पास नसल्यामुळे या लोकांनी पोलिसांशी वाद घातला आणि नाकाबंदीवरील बॅरिकेड तोडून पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना घेरले. 

यामुळे संतप्त झालेल्या एका निहंगाने तलवारीने पोलिसांवर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. निहंग सिंग बलबेरा भागात बांधलेल्या गुरुद्वारा खिचडी साहेब येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर निहंगे गुरुद्वारात लपले. दरम्यान पोलिस गुरुद्वाराजवळ पोहोचले असून

त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगत आहेत. 

निहांग समुदायाचे प्रमुख म्हणाले - पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला

पतियाळात निहंग समुदायाचे प्रमुख 96 कोटी बाबा बलबीर सिंह म्हटले की, "आरोपींनी निहंग सिंग सारखा वेश केला होता मात्र आमचा सुमदाय असे करू शकत नाही. हा पंथ लोक आणि असहाय्य लोकांच्या मदतीसाठी तयार झाला आहे. पोलिसांवर हल्ला करणारे हे फक्त आणि फक्त गुंड आहेत."

पंजाबमध्ये 30 एप्रिलपर्यंत कर्फ्यू, येथे 150 पेक्षा अधिक संक्रमित 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंजाब सरकारने 30 एप्रिलपर्यंत कर्फ्यू वाढवला आहे. राज्यात 23 मार्च रोजी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. तो 14 एप्रिल रोजी संपणार होता. मात्र संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता कर्फ्यू वाढवण्यात आला. राज्यात आतापर्यंत 150 पेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमित झाले आहे तर 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...