आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Punjab DIG Lakhminder Singh Resigns To Support Farmers Protest : Said I Am Son Of A Farmer, I Will Fight For The Rights Of My Brothers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचे समर्थन:पंजाबचे DIG लखमिंदरसिंग यांनी दिला राजीनामा; म्हणाले - शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपल्या बांधवांच्या हक्कासाठी लढेन

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला आंदोलनात सहभागी व्हायचे आहे, मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा : DIG लखमिंदरसिंग

कृषी कायद्याविरोधात 18 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता पंजाब पोलिसही आले आहेत. DIG(जेल) लखमिंदर सिंह जाखड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ADGP (जेल) पीके सिन्हा यांनी राजीनाम्याची प्रत मिळाल्याची पुष्टी केली आहे.

लखमिंदर यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले की, राज्यातील शेतकरी संकटात आहेत. थंडीत आभाळाखाली रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. यामुळे मला या आंदोलनाचा भाग व्हायचे आहे. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा, जेणेकरून दिल्लीत जाऊन आपल्या शेतकरी बांधवांसोबत आपल्या हक्कासाठी लढा देऊ शकेल.

माजी मुख्यमंत्री यांनी पुरस्कार परत केला होता

याआधी पंजाबच्या अनेक दिग्गजांनी शेतकऱ्यांचे समर्थन करत आपले पुरस्कार परत केले आहेत. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार परत करून याची सुरुवात केली होती. यानंतर राज्यसभा खासदार सुखदेव सिंह ढींढसा यांनी पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.

पंजाबीतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेचे पंजाबचे प्रसिद्ध शायर डॉ. मोहनजीत, प्रख्यात विचारवंत डॉ. जसविंदर सिंह आणि पंजाबी नाटटकार आणि एका वर्तमानपत्राचे संपादक यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser